२४५० सभासदांना २१.३५ कोटींचे पीककर्ज वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 04:44 AM2021-05-20T04:44:35+5:302021-05-20T04:44:35+5:30
खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटप प्रक्रिया विविध बँकामार्फत एप्रिल महिन्यात सुरू करण्यात आली आहे. शिरपूर परिसरात सेवा सोसायटी ...
खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटप प्रक्रिया विविध बँकामार्फत एप्रिल महिन्यात सुरू करण्यात आली आहे. शिरपूर परिसरात सेवा सोसायटी मार्फत जिल्हा मध्यवर्ती बँक शाखा शिरपूर तर राष्ट्रीयकृत बँकेच्यावतीने बँक ऑफ महाराष्ट्र व विदर्भ क्षेत्रीय कोंकण बँकेच्यावतीने कर्ज वाटप करण्यात येत आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून २१ सेवा सोसायटीच्या २४५० सभासदांना २१ कोटी ३५ लाख रुपये इतके पीक कर्ज १८ मे पर्यंत वितरण करण्यात आले असल्याचे शाखा व्यवस्थापक किशोर चव्हाण व बँक निरीक्षक काशिनाथ गायकवाड यांनी सांगितले. राष्ट्रीयकृत बँकेचेवतीने बँक ऑफ महाराष्ट्र ३०४ शेतकऱ्यांना २ कोटी ७५ लाख पीक कर्ज वितरण करण्यात आले असल्याची माहिती शिरपूर शाखा व्यवस्थापक शशिकुमार यांनी दिली. विदर्भ क्षेत्रीय कोंकण बँकेच्यावतीने ५ मे पर्यंत २०० शेतकऱ्यांना १ कोटी ६० लाख रुपये इतके पीक कर्ज वितरण करण्यात आले आहे. एकंदरीत शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटपाच्या प्रक्रियेमध्ये राष्ट्रीय बँका जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या तुलनेत फार मागे असल्याचे दिसत आहे. यामागे मुख्य कारण अपुरी कर्मचारी संख्या असल्याचे राष्ट्रीयकृत बँकेच्यावतीने सांगण्यात आले आहे. मागील काही वर्षांच्या तुलनेत राष्ट्रीयकृत बँकेची कर्ज वितरण प्रक्रिया पूर्वीपेक्षा अधिक गतीने होत आहे.