१६ हजार ८०८ मुला-मुलींना जंतनाशक गोळ्यांचे वाटप!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2019 03:59 PM2019-08-17T15:59:04+5:302019-08-17T15:59:12+5:30
या मोहीमे अंतर्गत एकुण १६ हजार ८०८ मुला मुलींना जंतनाशक गोळ्यांचे वाटप करण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
कारंजा : राष्ट्रीय जंतनाशक दिवशी आरोग्य विभागाच्या वतीने जंतनाशक गोळ्या वाटप मोहीम राबवून १ ते १९ वर्षेे वयोगटातील मुला मुलींना जंतनाशक गोळ्यांचे वितरण करण्यात येते. यासाठी आरोग्य विभाग, शिक्षण विभाग, अंगणवाडी, एकात्मिक महिला व बालविकास विभाग, शाळा, महाविद्यालये व्यवस्थापन समिती यांची मदत घेतल्या जाते. यंदा वाशिम जिल्ह्याकरिता सुमारे ३ लाख ७९ हजार मुला मुलींना जंतनाषक गोळ्यांचे वाटप करण्याचे उद्दिष्ट आहे. या उद्दिष्टपुर्तीच्या पार्श्वभुमीवर कारंजा उपजिल्हा रूग्णालयाच्या वतीने ८ आॅगस्ट रोजी जंतनाशक गोळ्या वाटप मोहीम राबविण्यात आली. या मोहीमे अंतर्गत एकुण १६ हजार ८०८ मुला मुलींना जंतनाशक गोळ्यांचे वाटप करण्यात आले. प्राप्त माहितीनुसार कारंजा उपजिल्हा रूग्णालयाच्या वतीने राष्ट्रीय जंतनाशकदिनाचे औचित्य साधून कारंजा शहरातील ५२ शाळा व संपुर्ण अंगणवाड्या, यासह इतर ठिकाणी जंतनाशक गोळ्यावाटप मोहीम राबविण्यात आली. सदर मोहीमेकरिता शासनाच्या वतीने २१ हजार २७४ गोळ्यांचा पुरवठा करण्यात आला होता. त्यापैकी १६ हजार ८०८ गोळ्यांचे वाटप करण्यात आले. यापैकी १३ हजार ६३१ गोळ्या ५२ शाळेत, २ हजार ९८२ गोळ्या सर्व अंगणवाडीत तर १९६ गोळ्यांचे इतर ठिकाणी वाटप करण्यात आले. ८ आॅगस्ट रोजी सदर मोहीमेत गैरहजर असणाºया मुलामुलींना १६ आॅगस्ट रोजी जंतनाशक गोळ्या वितरीत करण्यात आल्यात. त्यामुळे ही मोहीम यशस्वी झाली असल्याची माहिती कारंजा उपजिल्हा रूग्णालयातील आरोग्य सहायक कुंदन जाधव यांनी दिली आहे.