कारंजात २७९ लाभार्थींना रेशनकार्डचे वितरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2018 01:37 PM2018-10-14T13:37:05+5:302018-10-14T13:38:00+5:30
कारंजा (वाशिम) : सुवर्ण जयंती महाराजस्व अभियानांतर्गत कारंजा पंचायत समितीच्या सभागृहात आयोजित शिबिरात २७९ लाभार्थींना नवीन तसेच विभक्त रेशनकार्डचे तसेच २७० अतिक्रमीत घरकुल धारकांना भाडेपट्ट्यांचे वाटप करण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
कारंजा (वाशिम) : सुवर्ण जयंती महाराजस्व अभियानांतर्गत कारंजा पंचायत समितीच्या सभागृहात आयोजित शिबिरात २७९ लाभार्थींना नवीन तसेच विभक्त रेशनकार्डचे तसेच २७० अतिक्रमीत घरकुल धारकांना भाडेपट्ट्यांचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाला आमदार राजेंद्र पाटणी, उपविभागीय अधिकारी डॉ.शरद जावळे, तहसीलदार भोसले, गटविकास अधिकारी तापी, भाजपा तालुकाध्यक्ष डॉ.राजीव काळे, माजी तालुकाध्यक्ष निरंजन करडे आदी मान्यवरांसह पुरवठा विभागातील अधिकारी व कर्मचाºयांची उपस्थिती होती. नवीन तसेच विभक्त रेशनकार्डसाठी ९६७ लाभार्थींनी अर्ज केले होते. त्रृटींची पुर्तता केलेल्या २७९ लाभार्थ्यांना आमदार राजेंद्र पाटणी यांच्या हस्ते रेशनकार्डचे वाटप केले. यावेळी आमदार पाटणी म्हणाले की, रेशनकार्ड हा आपला अधिकार असुन त्यासाठी नियमाप्रमाणे रितसर अर्ज करून त्रृटी असल्यास त्याची पुर्तता करावी. यासाठी कुणी दलाल तसेच कर्मचारी पैशाची मागणी करत असेल तर तहसीलदार तसेच उपविभागीय अधिकारी यांचेशी संपर्क साधावा असे आवाहन केले. रेशनकार्ड प्रकरणी दलाल तसेच पैशाची मागणी करणाºया कर्मचाºयांविरूद्ध कारवाई करण्याच्या सूचनाही अधिकाºयांना केल्या. उर्वरित प्रलंबित प्रकरणांचा निपटारा येत्या १५ दिवसात करण्याचे निर्देश संबंधित अधिकाºयांना दिले. उपविभागीय अधिकारी डॉ.शरद जावळे तसेच तहसीलदार भोसले यांनी उपस्थित लाभार्थ्यांना मार्गदर्शन केले.
२७० अतिक्रमणे नियमानुकूल
जागेअभावी घरकुलापासून पात्र लाभार्थी वंचित राहू नये म्हणून नियमानुसार अतिक्रमणे नियमानुकूल करण्यात येत आहेत. कारंजा तालुक्यातील २७० अतिक्रमणधारकांचे पट्टे नियमाकुल करून त्याचे वाटप आमदार पाटणी, उपविभागीय अधिकारी डॉ.जावळे यांच्याहस्ते करण्यात आले. दुसºया टप्प्यातील नियमानुकूल उर्वरित लाभार्थींना लवकरच भाडेपट्ट्यांचे वाटप करण्यात येणार असल्याचे तहसीलदार भोसले यांनी सांगितले.