हळदी-कुंकवाच्या कार्यक्रमात ‘सॅनिटरी नॅपकीन्स’चे वाण!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2020 02:24 PM2020-02-03T14:24:54+5:302020-02-03T14:25:21+5:30
हळदी-कुंकवाच्या कार्यक्रमास आलेल्या गावातील महिलांना ‘सॅनिटरी नॅपकीन्स’चे वितरण केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
मानोरा : तालुक्यातील सोमठाणा येथे महिलांसाठी तीळ संक्रांतीनिमित्त रविवारी हळदी-कुंकवाचा कार्यक्रम पार पडला. यात स्त्रियांचे आरोग्य चांगले राहण्याच्या उद्देशाने अभिनव उपक्रम राबवून वाणात चक्क ‘सॅनिटरी नॅपकिन्स’चे वितरण करण्यात आले. याकामी बचतगटातील महिलांनी पुढाकार घेतला.
स्त्रियांचे आरोग्य कायम चांगले राहण्यासाठी ‘सॅनिटरी नॅपकीन्स’चे मोठे महत्व असल्याची बाब लक्षात घेऊन सोमठाणा येथील महिलांचा माहेर बचतगट आणि माता रमाई बचतगटाने मानोरा पचांयत समितीच्या सभापती सागरताई जाधव व उपसभापती रुपाली राऊत यांच्या हस्ते हळदी-कुंकवाच्या कार्यक्रमास आलेल्या गावातील महिलांना ‘सॅनिटरी नॅपकीन्स’चे वितरण केले.
या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महिला बचतगटाच्या कल्पना संतोष खुपसे, सुनिता संतोश कांबळे, सरोज रमेश खिराडे, भाग्यश्री चैतन्यशिल खुपसे, विशाखा पुरुषोत्तम राऊत, अर्चना सुभाष पुरी, रेणुका अशोक राऊत, रंजना किशोर वाघमारे, शितल मनोज राऊत, शिला राजू वाघमारे आदिंनी पुढाकार घेतला.
(प्रतिनिधी)