आदिवासीबहुल गावात सॅनिटरी पॅड्स, मास्कचे वितरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2021 04:46 AM2021-05-25T04:46:04+5:302021-05-25T04:46:04+5:30
कोरोनाच्या संकटकाळात आदिवासीबहुल गावांमध्ये कुठलाही रोजगार उपलब्ध नाही. यामुळे विशेषतः महिलांना विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. मासिक पाळी ...
कोरोनाच्या संकटकाळात आदिवासीबहुल गावांमध्ये कुठलाही रोजगार उपलब्ध नाही. यामुळे विशेषतः महिलांना विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. मासिक पाळी दरम्यान त्यांना वैयक्तिक स्वच्छता बाळगता यावी, यासाठी ६० महिलांना सॅनिटरी पॅड्ससह मास्क, साबण यासह इतर साहित्य वितरित करण्यात आले. या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यार्थिनी तृप्ती सिकंटवर, सचिन राणे, यशोधन पाथ्रीकर, आपत्ती व्यवस्थापन पथकाचे सदस्य आदित्य इंगोले, गायत्री पेंढारकर, कल्याणी पेंढारकर, लक्ष्मण फरास, प्रदीप सावळे, सतीश गावंडे, बुद्धभूषण सुर्वे, प्रथम सिंकटवार, प्राचार्य डॉ. देवेंद्र गावंडे, प्रा. बापूराव डोंगरे, डॉ. ममता पाथ्रीकर, स्नेहल चौधरी आदींनी पुढाकार घेतला.
या उपक्रमाचे रुई आणि फेटरा या गावातील ग्रामस्थांनी कौतुक केले. भविष्यात महिला सक्षमीकरण कक्ष, राष्ट्रीय सेवा योजना व आपत्ती व्यवस्थापन पथकामार्फत दोन्ही गावात आदिवासी महिला सक्षमीकरण ही योजना राबवू. दोन्ही गावे दत्तक घेण्याचा मानस व्यक्त करण्यात आला.