वनसमृद्धी योजनेंतर्गत रोपांचे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2021 04:27 AM2021-07-04T04:27:10+5:302021-07-04T04:27:10+5:30
सामाजिक वनीकरण विभागाचे विभागीय वन अधिकारी लक्ष्मण पाटील, तसेच सामाजिक वनीकरण परिक्षेत्र वाशिमचे वनपरिक्षेत्र अधिकारी आ.जी. रत्नपारखी, ...
सामाजिक वनीकरण विभागाचे विभागीय वन अधिकारी लक्ष्मण पाटील, तसेच सामाजिक वनीकरण परिक्षेत्र वाशिमचे वनपरिक्षेत्र अधिकारी आ.जी. रत्नपारखी, वन कर्मचाऱ्यासह उपसरपंच जनार्दन किसन पाठे, अंगणवाडीसेविका शोभाताई राऊत, अंगणवाडी मदतनीस मालूताई पाठे, गावातील प्रतिष्ठित नागरिक व कन्या वन समृद्धी योजनेचे लाभार्थी म्हणून मुलीसोबतच त्यांचे पालक उपस्थित होते. प्रतिमुली दहा रोपे संगोपनासाठी विभागीय वन अधिकाऱ्यांच्या हस्ते वाटप करण्यात आली. सदर कार्यक्रम हा दगड उमरा येथे हनुमान मंदिरावर घेण्यात आला, तसेच सामाजिक वनीकरण विभागाच्या अंतर्गत ग्रामपंचायत कार्यालयांच्या ठरावानुसार गट लागवड घेण्याचे कामे करण्यात येणार आहे. त्यामुळे गावातील पाणीसाठा उंचावेल व गायी, म्हशीचा चारा उपलब्ध होईल व गावातील मजुरांना रोजगार उपलब्ध होईल यादृष्टीने सामाजिक वनीकरण विभाग वाशिममार्फत कामे करण्यात येणार आहेत.