वाशिम जिल्ह्यांत ८४७१ शेतकऱ्यांना मृद आरोग्य पत्रिकांचे वितरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2018 02:26 PM2018-10-16T14:26:18+5:302018-10-16T14:27:56+5:30
वाशिम जिल्ह्यात निवडण्यात आलेल्या २५ गावांतील १६७१ मृद नमुन्यांचे संकलन करून ८४७१ शेतकऱ्यांना मृद आरोग्य पत्रिकांचे वितरण करण्यात आले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम: शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या उद्देशाने केंद्रशासनाच्यावतीन आकांक्षीत जिल्ह्यांत कृषी कल्याण अभियान राबविण्यात येत आहे. या कार्यक्रमातंर्गत पहिल्या टप्प्यात वाशिम जिल्ह्यात निवडण्यात आलेल्या २५ गावांतील १६७१ मृद नमुन्यांचे संकलन करून ८४७१ शेतकऱ्यांना मृद आरोग्य पत्रिकांचे वितरण करण्यात आले आहे.
केंद्र शासनाच्यावतीने शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून १ जून २०१८ पासून कृषी कल्याण अभियान राबविण्यास सुरुवात केली आहे. या अभियानांतर्गत शेतकºयांना अद्ययावत तंत्रज्ञान आणि उत्पन्न वाढविण्यासाठी सहकार्य आणि मार्गदर्शन करण्यात येत आहे. याअंतर्गत विविध योजनांचा समावेश असून, त्यामध्ये प्रत्येक आकांक्षीत जिल्ह्यातील २५ गावातील शेतकºयांच्या जमिनीचा पोत सुधारण्यासाठी मदत व्हावी म्हणून मृद तपासणी करून मृद आरोग्य पत्रिकांचे वितरण करण्यात येत आहे. वाशिम जिल्ह्यात या अभियानात पहिल्या टप्प्यात निवडलेल्या २५ गावांतील १६७१ मृदा नमुन्यांचे संकलन करून ८४७१ शेतकºयांना मृद आरोग्य पत्रिकांचे वितरण करण्यात आले. आता दुसºया टप्प्यात निवडलेल्या २५ गावांत २१५४ मृद नमुन्यांचे संकलन करून त्यांची तपासणी करण्यात येत आहे.