तालुकास्तरीय स्मार्ट ग्राम पुरस्कारांचे वितरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2019 01:43 PM2019-01-28T13:43:06+5:302019-01-28T13:43:21+5:30
वाशिम: राज्य शासनाच्या स्मार्ट ग्राम पुरस्कार योजनेंतर्गत निकष पूर्ण करून तालुकास्तरावर सर्वाधिक गुण पटकावणाºया सहा ग्रामपंचायतींना तालुका स्मार्ट ग्राम म्हणून प्रजासत्ताकदिनी पुरस्कृत करण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम: राज्य शासनाच्या स्मार्ट ग्राम पुरस्कार योजनेंतर्गत निकष पूर्ण करून तालुकास्तरावर सर्वाधिक गुण पटकावणाºया सहा ग्रामपंचायतींना तालुका स्मार्ट ग्राम म्हणून प्रजासत्ताकदिनी पुरस्कृत करण्यात आले. पालकमंत्र्यांच्या हस्ते या ग्रामपंचायतींना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. यावेळी जि. प. अध्यक्ष हर्षदा देशमुख, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रभारी जिल्हाधिकारी दीपककुमार मीना आदिंची उपस्थिती होती.
राज्य शासनाच्यावतीने सन २०१८-१९ या वर्षासाठी घेण्यात आलेल्या स्मार्ट ग्राम पुरस्कार स्पर्धेंतर्गत स्वमुल्यांकन करून पंचायत समितीस्तवर प्रस्ताव सादर करणाºया ग्रामपंचायतींची तपासणी जिल्हास्तर समितीच्यावतीने करण्यात आली. यात स्वच्छता, व्यवस्थापन, दायित्व, पारंपरिक उर्जा व पर्यावरण, पारदर्शकता व तंत्रज्ञानाचा वापर यावर आधारित कार्याच्या तपासणीचा समावेश होता. यात सर्व निकष पूर्ण करणाºया सहा ग्रामपंचायतींची तालुका स्मार्ट ग्राम म्हणून निवड करण्यात आली. यात मानोरा तालुक्यातील गिरोली, मंगरुळपीर तालुक्यातील सायखेडा, कारंजा तालुक्यातील विळेगाव, रिसोड तालुक्यातील बिबखेडा, मालेगाव तालुक्यातील ढोरखेडा आणि वाशिम तालुक्यातील काटा या ग्रामपंचायतींचा समावेश होता. या सर्व ग्रामपंचायतींचा २६ जानेवारी रोजी पालकमंत्र्यांच्या हस्ते प्रमाणपत्र व पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. सायखेडा ग्रामपंचायतीकडून पुरस्कार स्विकारताना सरपंच विद्या गहुले, उपसरपंच मनिष गहुले, ग्रामसेविका विद्या गहुले यांची उपस्थिती होती. बिबखेड्याच्या सरपंच बेबीबाई पवार, ग्रामसेवक लंगडे, तंटामुक्ती अध्यक्ष बाबाराव पाटील, तसेच इतर ग्रामपंचायतींचे पुरस्कार संबंधित सरपंच व ग्रामसेवकांनी स्विकारले.