‘त्या’ जंतनाशक गोळ्यांचे वितरण बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2021 04:39 AM2021-03-06T04:39:26+5:302021-03-06T04:39:26+5:30
राष्ट्रीय जंतनाशक दिन मोहिमेंतर्गत जिल्हाभरात १ मार्चपासून १ ते १९ वर्षे वयोगटांतील मुलांना जंतनाशक गोळ्यांचे वितरण आरोग्य विभागाकडून केले ...
राष्ट्रीय जंतनाशक दिन मोहिमेंतर्गत जिल्हाभरात १ मार्चपासून १ ते १९ वर्षे वयोगटांतील मुलांना जंतनाशक गोळ्यांचे वितरण आरोग्य विभागाकडून केले जात आहे. यासाठी पथकांची नियुक्तीही आरोेग्य विभागाने केली आहे. ही पथके घरोघरी फिरून बालकांना जंतनाशक गोळ्यांचे वितरण करीत आहेत. या मोहिमेसाठी जिल्हा आरोग्य विभागाकडून उपलब्ध करून देण्यात आलेल्या गोळ्यांपैकी बॅच क्रमांक एईटी २०४३ मधील एका पाकिटातील एका गोळीत काडीसदृश पदार्थ दोन दिवसांपूर्वी आढळून आला. यावरून जिल्हाधिकाऱ्यांनी आरोग्य अधिकाऱ्यांना शहनिशा करून, योग्य ती कार्यवाही करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार, जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी ४ मार्च रोजीच या संदर्भात आदेश निर्गमित करून राष्ट्रीय जंतनाशक मोहिमेंतर्गत वितरित करण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या बॅच क्रमांक एईटी २०४३ मधील गोळ्यांचे बालकांना वितरण न करण्याचे निर्देश आरोग्य यंत्रणेला दिले आहेत.
===Photopath===
050321\05wsm_2_05032021_35.jpg
===Caption===
‘त्या’ जंतनाशक गोळ्यांचे वितरण बंद