जिल्हा प्रशासनातर्फे घरी जाऊन स्वातंत्र सैनिकाचा सन्मान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 9, 2020 04:35 PM2020-08-09T16:35:47+5:302020-08-09T16:35:58+5:30
वाशिमचे उपविभागीय अधिकारी प्रकाश राऊत यांनी जनार्धन खेडकर व त्यांच्या पत्नी साधना खेडकर यांचा सत्कार केला.
वाशिम : कोरोनामुळे यंदा आॅगस्ट क्रांती दिनानिमित्त राष्ट्रपती भवन नवी दिल्ली येथे होणारा स्वातंत्र्य सैनिकांचा सत्कार सोहळा रद्द झाला असून, या सोहळ्यासाठी निवड झालेल्या स्वातंत्र्य सैनिकांचा घरी जाऊन जिल्हा प्रशासनातर्फे सन्मान करण्यात आला. त्या अनुषंगाने वाशिम येथील स्वातंत्र सैनिक जनार्धन खेडकर यांचा ९ आॅगस्ट रोजी राष्ट्रपती यांच्यावतीने वाशिमचे उपविभागीय अधिकारी प्रकाश राऊत यांनी शाल, अंगवस्त्र देवून सत्कार केला.
यंदा कोरोनामुळे स्वातंत्र्य सैनिकांना नवी दिल्ली येथे बोलाविणे योग्य होणार नसल्याने, राष्ट्रपती भवन येथील सत्कार समारंभासाठी निवड झालेल्यांचा सत्कार त्यांच्या घरी जावून करण्याचे निर्देश केंद्रीय गृह मंत्रालयाने दिले होते. या कार्यक्रमासाठी राज्य शासनाने वाशिम येथील स्वातंत्र सैनिक जनार्धन खेडकर यांचे नाव प्रस्तावित केले होते. त्यानुसार राष्ट्रपती यांच्यावतीने वाशिमचे उपविभागीय अधिकारी प्रकाश राऊत यांनी जनार्धन खेडकर व त्यांच्या पत्नी साधना खेडकर यांचा सत्कार केला.