जिल्हाधिकाऱ्यांनी साधला वढवीवासीयांशी संवाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2019 02:40 PM2019-01-25T14:40:14+5:302019-01-25T14:40:33+5:30
वाशिम : महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानात निवड झालेल्या वढवी गावात प्रभारी जिल्हाधिकारी तथा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार मीना यांनी गुरुवारी ग्रामस्थांशी संवाद साधला.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानात निवड झालेल्या वढवी गावात प्रभारी जिल्हाधिकारी तथा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार मीना यांनी गुरुवारी ग्रामस्थांशी संवाद साधला. यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गावसाने, तहसीलदार रणजीत भोसले, अभियानाचे जिल्हा समन्वयक वासू ढोणे, सरपंच, पोलीस पाटील यांच्यासह तालुका यंत्रणेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानांतर्गत निवड झालेल्या गावात शासनाच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी केली जाणार आहे. या अभियानात वढवी गावाची निवड झाली आहे. यावेळी ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानाच्या नामफलकाचे उदघाटन मीना यांनी केले. प्रमुख पाहुण््यांचे गावातील भजनी मंडळाने स्वागत केले. सुरूवातीला गावातील विद्यार्थ्यांनी गावफेरी काढली. सायंकाळी मीना यांनी ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानाबाबत ग्रामस्थांशी चर्चा केली. या अभियानाच्या निर्देशांकानुसार गावात सुरु असलेल्या कामांचा आढावा घेत शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले. तसेच ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेतल्यानंतर सदर समस्या निकाली काढणार असल्याचे ग्रामस्थांना आश्वस्त केले. अभियानाअंतर्गत गावात सुरु असलेल्या कामांची पाहणी करण्यात आली. यावेळी अभियानांतर्गतच्या कामाबाबतची माहिती ग्राम परिवर्तक अमोल पाचडे यांनी दिली.