जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला कोरोना सद्य:स्थितीचा आढावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:50 AM2021-06-09T04:50:34+5:302021-06-09T04:50:34+5:30

यावेळी कारंजाचे उपविभागीय अधिकारी राहुल जाधव, तहसीलदार शारदा जाधव, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सागर जाधव, पोलीस निरीक्षक शिशिर मानकर, ...

District Collector Corona reviewed the current situation | जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला कोरोना सद्य:स्थितीचा आढावा

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला कोरोना सद्य:स्थितीचा आढावा

googlenewsNext

यावेळी कारंजाचे उपविभागीय अधिकारी राहुल जाधव, तहसीलदार शारदा जाधव, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सागर जाधव, पोलीस निरीक्षक शिशिर मानकर, नायब तहसीलदार संदेश किर्दक, जी. एम. राठोड, सहायक गट विकास अधिकारी श्री. कांबळे, बालविकास प्रकल्प अधिकारी श्री. ननावरे, गटशिक्षणाधिकारी अनिल पवार यांची प्रमुख उपस्थिती होती.

जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. म्हणाले, जिल्ह्यात सध्या कोरोना विषाणू संसर्गाचे प्रमाण कमी होत असले तरी गाफील राहून चालणार नाही. आगामी काही दिवसात कोरोना विषाणू संसर्गाची तिसरी लाट येण्याची शक्यता तज्ज्ञांकडून वर्तवली जात आहे. या लाटेपासून बचाव करण्यासाठी कोरोना प्रतिबंधक लसीकरण महत्त्वाचे ठरणार आहे. त्यामुळे मानोरा तालुक्यातील लसीकरण मोहिमेला अधिक गती देण्यासाठी सूक्ष्म नियोजन करावे. ग्रामीण भागामध्ये घरोघरी जाऊन लसीकरणाविषयी जनजागृती करून लोकांच्या मनातील गैरसमज दूर करावेत. लसीकरणाचे महत्त्व पटवून देऊन पात्र व्यक्तींचे जास्तीत जास्त लसीकरण करण्यावर भर द्यावा, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिले.

०००

हलगर्जी झाल्यास कठोर कार्यवाही

मानोरा तालुक्यातील कोरोना चाचण्यांची संख्यांची आणखी वाढविण्यासाठी योग्य नियोजन करावे. कोरोना बाधितांचे संस्थात्मक विलगीकरण, कोरोना बाधितांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध, लसीकरण मोहीम, कोरोना चाचण्या या अनुषंगाने सोपविलेली जबाबदारी सर्व संबंधितांनी व्यवस्थितपणे पार पाडावी, यामध्ये कोणताही हलगर्जीपणा झाल्यास नाईलाजाने संबंधितांवर कठोर कार्यवाही करावी लागेल, असा इशारा जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी यावेळी दिला. तसेच सर्व शासकीय कोरोना संसर्ग नियंत्रणात ठेवण्यासाठी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून समन्वयाने काम करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

Web Title: District Collector Corona reviewed the current situation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.