कोरोना लसीकरण केंद्रांना जिल्हाधिकाऱ्यांची भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2021 04:42 AM2021-04-04T04:42:26+5:302021-04-04T04:42:26+5:30
यावेळी मालेगावचे तहसीलदार रवी काळे, गटविकास अधिकारी पद्मावार, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संतोष बोरसे यांची प्रमुख उपस्थिती होती. ...
यावेळी मालेगावचे तहसीलदार रवी काळे, गटविकास अधिकारी पद्मावार, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संतोष बोरसे यांची प्रमुख उपस्थिती होती. जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी मालेगाव ग्रामीण रुग्णालय, करंजी उपकेंद्र यासह ग्रामीण भागातील लसीकरण केंद्रांची पाहणी केली, तसेच शेलगाव बोंदाडे येथील प्रतिबंधित क्षेत्राला भेट देऊन तेथील कोरोना प्रतिबंधक उपाययोजना अंमलबजावणीविषयी माहिती घेतली.
जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. म्हणाले, ४५ वर्षांवरील सर्व व्यक्तींना लवकरात लवकर कोरोना प्रतिबंधक लसीकरण करणे आवश्यक आहे. लसीकरण मोहिमेला गती देण्याची आवश्यकता असून, शहरी व ग्रामीण भागातील प्रत्येक पात्र व्यक्तीपर्यंत लसीकरणाची माहिती पोहोचविण्यासाठी प्रयत्न करावा. याकरिता आशा कर्मचारी, अंगणवाडी सेविका, शिक्षक यांची पथके स्थापन करून घरोघरी जाऊन लसीकरण मोहिमेविषयी जनजागृती करावी, तसेच प्रतिबंधित क्षेत्रातील व्यक्तींची कोरोना चाचणी व कोरोना प्रतिबंधक लसीकरण लवकर पूर्ण करावे, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.