जिल्हा विकास आराखड्याचा अतिरिक्त सचिवांकडून आढावा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2018 01:33 AM2018-03-06T01:33:11+5:302018-03-06T01:33:11+5:30

वाशिम : केंद्र शासनाच्या नीती आयोगाच्या माध्यमातून राबविण्यात  येत असलेल्या  ‘कन्व्हर्जन्स, इंटेग्रेशन अ‍ॅण्ड फोकस्ड अटेंशन टू बॅकवर्ड डिस्ट्रिक्टस’ या उपक्रमात वाशिम जिल्ह्याचाही समावेश आहे. त्यानुषंगाने सन २०१९ ते २०ं२२ या कालावधीत जिल्ह्याच्या विकासासाठी तयार करण्यात आलेल्या आराखड्याचा आढावा ५ मार्च रोजी केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या अतिरिक्त सचिव तथा जिल्ह्याच्या प्रभारी अधिकारी जयश्री मुखर्जी यांनी घेतला.

District Development Plan Reviewed by Additional Secretaries | जिल्हा विकास आराखड्याचा अतिरिक्त सचिवांकडून आढावा 

जिल्हा विकास आराखड्याचा अतिरिक्त सचिवांकडून आढावा 

Next
ठळक मुद्देजिल्ह्याच्या विकासाला गती

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : केंद्र शासनाच्या नीती आयोगाच्या माध्यमातून राबविण्यात  येत असलेल्या  ‘कन्व्हर्जन्स, इंटेग्रेशन अ‍ॅण्ड फोकस्ड अटेंशन टू बॅकवर्ड डिस्ट्रिक्टस’ या उपक्रमात वाशिम जिल्ह्याचाही समावेश आहे. त्यानुषंगाने सन २०१९ ते २०ं२२ या कालावधीत जिल्ह्याच्या विकासासाठी तयार करण्यात आलेल्या आराखड्याचा आढावा ५ मार्च रोजी केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या अतिरिक्त सचिव तथा जिल्ह्याच्या प्रभारी अधिकारी जयश्री मुखर्जी यांनी घेतला. यावेळी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कापडणीस यांची प्रमुख उपस्थिती होती.
जिल्ह्याच्या विकासाला गती देण्यासाठी आरोग्य आणि पोषण, शिक्षण, कृषी व सलग्न क्षेत्र, आर्थिक समावेशकता, कौशल्य विकास आणि पायाभूत सुविधा आदी क्षेत्रातील ४८ निर्देशांक निश्चित करण्यात आले आहेत. सन २०२२ पर्यंत जिल्ह्याचा विकास साधण्यासाठी या निर्देशांकांवर आधारित आराखडा संबंधित यंत्रणांनी तयार केला आहे. त्याचा आढावा आज घेण्यात आला. तसेच संबंधित विभागांनी नेमक्या कोणत्या बाबींवर लक्ष केंद्रित करावे, याविषयी मुखर्जी यांनी मार्गदर्शन केले. आढावा बैठकीस जिल्हा नियोजन अधिकारी सुरेंद्र गवळी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अरुण राऊत, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गावसाने, अग्रणी बँकेचे व्यवस्थापक नगराळे यांच्यासह आरोग्य, कृषी, शिक्षण, जलसंपदा यासह विविध यंत्रणांचे क्षेत्रीय अधिकारी उपस्थित होते.

Web Title: District Development Plan Reviewed by Additional Secretaries

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :washimवाशिम