वाशिममध्ये ८ डिसेंबरपासून जिल्हास्तरीय युवा महोत्सव!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2017 08:32 PM2017-12-04T20:32:22+5:302017-12-04T20:35:34+5:30
वाशिम जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने येत्या ८ डिसेंबरपासून जिल्हास्तर युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. क्रीडा संकुलाच्या बहुउद्देशीय हॉलमध्ये होणाºया या महोत्सवात युवा कलावंतांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम: स्थानिक जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने येत्या ८ डिसेंबरपासून जिल्हास्तर युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. क्रीडा संकुलाच्या बहुउद्देशीय हॉलमध्ये होणा-या या महोत्सवात युवा कलावंतांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
या महोत्सवात १५ ते ३५ वयोगटातील युवक-युवती सहभागी होऊ शकतात. त्यासाठी संबंधित स्पर्धकांना जन्मतारखेचा दाखला व नजिकच्या काळातील छायाचित्र अर्जासोबत जोडणे बंधनकारक आहे. वेशभूषा, रंगभूषा आदी व्यवस्था स्पर्धकास स्वत:च करावी लागेन. केवळ विद्यूत आणि ध्वनिक्षेपकाची सोय वाशिम क्रीडा अधिकारी कार्यालय करणार आहे. साथसंगतीकरिता आवश्यक ते सह कलाकार व वाद्यवृंदांची जबाबदारी त्या-त्या कलावंतांची राहील, असे कळविण्यात आले. या युवा महोत्सवात लोकनृत्य, लोकगित, एकांकिता (इंग्रजी/हिंदी), शास्त्रीय गायन, बासरी, विणा, तबला, मृदंग, हार्मोनियम, शास्त्रीय नृत्य (मणिपूरी, ओडिसी, भरतनाट्यम, कथक, कुचीपुडी आदी), वक्तृत्व आदी कलाप्रकारांचा समावेश करण्यात आलेला आहे.