वाशिम जिल्ह्यात सर्वदूर बरसल्या मृगधारा !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2018 03:42 PM2018-06-08T15:42:59+5:302018-06-08T15:42:59+5:30
वाशिम : मृगातील पावसाने शुक्रवारी सकाळपासूनच जिल्ह्यात सर्वदूर हजेरी लावून शेतकºयांना सुखद धक्का दिला.
वाशिम : मृगातील पावसाने शुक्रवारी सकाळपासूनच जिल्ह्यात सर्वदूर हजेरी लावून शेतकºयांना सुखद धक्का दिला. यादरम्यान काहीठिकाणी घरांमध्ये पाणी घुसल्याने नागरिकांची त्रेधातिरपिट उडाली. खरीप हंगामासाठी हा पाऊस निश्चितपणे फायदेशीर ठरणार असल्याचा दावा शेतकºयांनी केला.
जिल्ह्यात गतवर्षीच्या पावसाळ्यात सरासरी पर्जन्यमानात सुमारे ३० टक्के घट झाली होती. यावर्षी चांगला पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविलेला आहे. त्यामुळे शेतकºयांमध्ये तुर्तास तरी समाधानाचे वातावरण असल्याचे दिसून येते. शुक्रवारी सकाळी ८ वाजताच्या सुमारास वाशिम शहरासह जिल्ह्यात सर्वदूर पाऊस झाला. वाशिम तालुक्यातील कोंडाळा महाली परिसरात सकाळी ८.३० वाजतादरम्यान धो- धो पाऊस बरसला. शेतातही पाणी साचले. मंगरूळपीर शहरासह तालुक्यात दमदार पाऊस झाला. वाशिम शहरातही सकाळी वाजताच्या सुमारास सुमारे २० मिनिटे पाऊस झाला. योजना कॉलनी क्रमांक एकमध्ये पावसाचे पाणी घरात घुसल्याने नागरिकांची चांगलीच धावपळ झाली.गत १५ वर्षांपासून विकासापासून कोसोदूर राहिलेल्या या कॉलनीकडे ग्रामपंचायतने लक्ष देणे अपेक्षीत आहे. रस्त्यावर साधा मुरूमही टाकला नसल्याने सर्वत्र पाणी साचल्याचे दिसून येते. मालेगाव, रिसोड तालुक्यातही काही ठिकाणी पाऊस झाला. पावसाच्या सरी कोसळल्याने जनजीवन सुखावले आहे. खरीप हंगामातील पेरणीसाठी हा पाऊस फायदेशीर ठरत असल्याचे शेतकºयांमधून बोलले जात आहे.