वाशिम जिल्ह्यात ‘सोशल डिस्टन्सिंग’ची ऐशीतैशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2020 10:29 AM2020-04-04T10:29:22+5:302020-04-04T10:29:27+5:30
३ एप्रिल रोजी जिल्हयात बँका, स्वस्त धान्य दुकानावर एकच गर्दी दिसून आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : जगभरात कोरोना विषाणूचा संसर्ग पसरत असल्याने खबरदारी म्हणून प्रशासन अविरत प्रयत्न करताना दिसून येत आहे. गर्दी करण्याचे टाळावे, मास्क वापरावे, सोशल डिस्टन्सिंग ठेवावे, स्वच्छ हात धुण्यासह ईतर बाबींबाबत जनजागृती करीत असतांना सुध्दा काही नागरिक याकडे दुर्लक्ष दिसून येत आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे सोशल डिस्टन्सिंगला नागरिक पाळत नसल्याचे चित्र जिल्हयात दिसून येत आहे. ३ एप्रिल रोजी जिल्हयात बँका, स्वस्त धान्य दुकानावर एकच गर्दी दिसून आली.
वाशिम शहरामध्ये सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पूर्णपणे पालन होत असले तरी ग्रामीण भागात मात्र पारावर, बसथांब्यावर मात्र ग्रामस्थ गर्दी करताना दिसून येत आहेत. मानोरा परिसरातील फुलउमरीसह शहरामध्ये अनेक ठिकाणी नागरिक बिनधास्तपणे वावरतांना व सोशल डिस्टन्सिंगचे उल्लंघन करताना दिसूनयेत आहेत. वाशिम शहरातील अत्यावश्यक सेवेच्या दुकानांसमोर १ मिटर अंतराचे गोलआकाराचे डब्बे आखून ठेवले आहेत. नागरिक त्या जागेवर उभे राहून व्यवहार करीत आहेत.
जिल्हयातील जिल्हा मध्यवर्ती बँकेत सद्यस्थितीत ग्राहकांची गर्दी मोठया प्रमाणात होत असून तेथे सुरक्षित अंतर ठेवण्यात येत नसल्याचे दिसून येत आहे. प्रशासनाने याबाबत कठोर पाऊल उचलणे गरजेचे असल्याचे मत सुज्ञ नागरिकांतून व्यक्त केल्या जात आहे.