वाशिम जिल्ह्यात पारंपरिक पद्धतीने हळद काढण्याची प्रक्रिया सुरु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2019 02:12 PM2019-04-07T14:12:55+5:302019-04-07T15:39:44+5:30

द्या काढणी प्रक्रिया आटोपलेल्या शेतकऱ्यांकडून आता ओली हळद उकळण्याच्या प्रक्रियेस गती देण्यात आल्याचे दिसून येत आहे.

In the district of Washim, traditional process of turmeric removal started | वाशिम जिल्ह्यात पारंपरिक पद्धतीने हळद काढण्याची प्रक्रिया सुरु

वाशिम जिल्ह्यात पारंपरिक पद्धतीने हळद काढण्याची प्रक्रिया सुरु

Next

शिरपूर जैन (वाशिम) : वाशिम जिल्ह्यात दरवर्षी हळदीची विक्रमी लागवड केली जाते. त्यानुषंगाने यंदाही बहुतांश शेतकऱ्यांनी हे पीक घेतले. हळद पिकाची काढणी आटोपली असून, ओली हळद उकळण्याच्या प्रक्रियेस वेग आला आहे. सद्या काढणी प्रक्रिया आटोपलेल्या शेतकऱ्यांकडून आता ओली हळद उकळण्याच्या प्रक्रियेस गती देण्यात आल्याचे दिसून येत आहे. हळद काढल्यानंतर शेतांमध्येच भट्टी पेटवून त्यावर ठेवल्या जाणाºया मोठ्या कढईत हळद उकळली जाते. तुलनेने कठीण असलेल्या हळद काढण्याच्या या पारंपरिक प्रक्रियेसाठी अनुभवी मजूरांची मदत घेतली जात आहे. यंदा हळदीपासून विक्रमी उत्पन्न हाती पडण्याची शक्यता हळद उत्पादक शेतकऱ्यांनी वर्तविली आहे.

Web Title: In the district of Washim, traditional process of turmeric removal started

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.