‘त्या’ बदनामीकारक वक्तव्याचा जिल्हाभरात निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2021 04:27 AM2021-06-22T04:27:39+5:302021-06-22T04:27:39+5:30
निवेदनात नमूद आहे की, राजपुत समाजाचे भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये मोठे योगदान आहे. महाराणा प्रताप यांच्यासह लाखोे राजपुत समाजातील वीर ...
निवेदनात नमूद आहे की, राजपुत समाजाचे भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये मोठे योगदान आहे. महाराणा प्रताप यांच्यासह लाखोे राजपुत समाजातील वीर योद्ध्यांनी भारतमातेला गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी आपल्या प्राणाचे बलिदान दिले आहे. गेल्या ५०० वर्षांपासून राजपुत समाजाने देशाला वाचविण्यासाठी मोठा रणसंग्राम केला आहे. भारताच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये राजपुत समाजाचे मोठे योगदान आहे. परंतु काही व्यक्तींकडून राजपुत समाजात फूट पाडण्यासाठी राजपुुत समाजाबद्दल किंवा या समाजातील महापुरुषांबद्दल अपशब्द बोलून घाणेरडे राजकारण खेळून आपली पोळी शेकण्याचा प्रयत्न करतात. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल माध्यमावरून संपूर्ण महाराष्ट्रभर पसरला असून या व्हिडीओेमध्ये धनंजय देसाई नामक व्यक्ती आपल्या भाषणाद्वारे राजपुत समाजाबद्दल शिवीगाळ व अपशब्द बोलताना दिसत आहे. या व्हिडीओमुळे समाजामध्ये तीव्र संतापाची भावना निर्माण झाली आहे. तरी शासनाने या गंभीर बाबीकडे लक्ष देऊन संबंधित धनंजय देसाई आणि सदर व्हिडीओ व्हायरल करणारा व्यक्ती शोधून त्यांच्यावर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली. वाशिम येथे निवेदन देताना अशोक चौहान, अजय चौहान, देवेंद्र ठाकूर, गुणवंत मालस, श्यामनारायण ठाकूर, धिरज तोमर, अर्जुन चंदेल, मनोज मालस, दयनेश्वर मालस यांच्यासह राजपुत संघटनेने पदाधिकारी आणि समाजबांधवांची उपस्थिती होती.