वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयात २० नोव्हेंबरला जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2017 01:48 PM2017-11-15T13:48:24+5:302017-11-15T13:51:55+5:30
वाशिम येथे जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या अध्यक्षतेखाली २० नोव्हेंबर २०१७ रोजी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वाकाटक सभागृहात महिला लोकशाही दिनाचे आयोजन केल्याची माहिती जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सुभाष राठोड यांनी दिली.
वाशिम - पिडीत व समस्याग्रस्त महिलांच्या प्रश्नांचा निपटारा करण्याच्या दृष्टिकोनातून प्रत्येक महिन्याच्या तिसºया सोमवारी जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिनाचे नियोजन केले जाते. वाशिम येथे जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या अध्यक्षतेखाली २० नोव्हेंबर २०१७ रोजी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वाकाटक सभागृहात महिला लोकशाही दिनाचे आयोजन केल्याची माहिती जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सुभाष राठोड यांनी दिली.
राज्य शासनाच्या महिला व बाल विकास विभागाच्या निर्णयानुसार पिडीत व समस्याग्रस्त महिलांना त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी हक्काचे व्यासपीठ मिळावे तसेच त्यांच्या हक्काचे संरक्षण होवून त्यांना न्याय मिळावा, या दृष्टीने प्रत्येक महिन्याच्या तिसºया सोमवारी जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते. तालुका स्तरावर चौथ्या सोमवारी आयोजित होणाºया महिला लोकशाही दिनात दाखल तक्रारींबाबत समाधान न झाल्यास महिलांना तालुका स्तरावर दाखल केलेल्या तक्रारीच्या टोकन क्रमांकासाहित विहित नमुन्यात जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिनात अर्ज सादर करता येतो. जिल्हाधिकारी कार्यालयाशी संबंधित तक्रारी सरळ जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिनात दाखल करता येतात. जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिनाच्या अर्जाचा नमुना महिला व बालविकास अधिकारी कार्यालयात उपलब्ध आहे. महिलांनी या अर्जानुसार तक्रारी सादर कराव्या, असे आवाहन राठोड यांनी केले.