मंगरुळपीर तहसीलदाराच्या चौकशीचे विभागीय आयुक्ताचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2019 05:39 PM2019-01-19T17:39:13+5:302019-01-19T17:39:33+5:30
मंगरुळपीर-येथील बहूचर्चीत रेतीतस्करी प्रकरणात आर्थीक देवानघेवाणीची आॅडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर सबंधित तहसिलदार,मंडळ अधिकारी आणी चालक यांचेवर कारवाई करन्यासाठीची मागणी आम आदमी पार्टीने केली होती . याची दखल घेवुन विभागिय आयुक्त यांनी याप्रकरणी सखोल चौकशी करुन अहवाल सादर करण्याचे आदेश वाशिम येथील अप्पर जिल्हाधिकार्यांना दिले आहे.

मंगरुळपीर तालुक्यात महसुल विभागाअंतर्गत भ्रष्टाचार सुरु असल्याच्या अनेकांनी तक्रारी वरिष्ठांना सादर केल्या होत्या . तसेच रेती तस्करी प्रकरणात आर्थीक देवानघेवानीची आॅडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर आम आदमी पार्टीने येथील तहसिलदार,मंडळ अधिकारी आणी चालक यांची विभागीय चौकशी करुन तात्काळ निलंबित करन्याच्या मागणीसाठी लेखी निवेदन वरिष्ठांना सादर केले होते. भाजपानेही तहसिलदारांवर कारवाईसाठी जिल्हाधिकार्यांकडे तक्रार सादर केली होती.अमरावती विभागिय आयुक्त यांनी या प्रकरणी गंभीरतेने दखल घेतली असुन सबंधित महसुल अधिकार्यांची सखोल चौकशी करुन अहवाल सादर करन्याचे आदेश अप्पर जिल्हाधिकारी यांना दिले आहे.दोषींवर कारवाई न झाल्यास २६ जानेवारी रोजी'आप'ने आत्मदहनाचा इशारा दिलेला आहे .