दिव्यांग वित्त विकास महामंडळाचा वसूली निरीक्षक ‘एसीबी’च्या जाळ्यात!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2019 06:22 PM2019-02-20T18:22:49+5:302019-02-20T18:22:58+5:30
वाशिम : स्थानिक समाज कल्याण कार्यालयाच्या इमारतीत असलेल्या दिव्यांग वित्त विकास महामंडळाच्या कार्यालयात कार्यरत वसूली निरीक्षक (कंत्राटी) योगेश कमलदास चव्हाण (३१) यास लाचलुचपत विभागाने ५ हजारांची लाच स्विकारताना रंगेहात जेरबंद केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : स्थानिक समाज कल्याण कार्यालयाच्या इमारतीत असलेल्या दिव्यांग वित्त विकास महामंडळाच्या कार्यालयात कार्यरत वसूली निरीक्षक (कंत्राटी) योगेश कमलदास चव्हाण (३१) यास लाचलुचपत विभागाने ५ हजारांची लाच स्विकारताना रंगेहात जेरबंद केले. ही कारवाई बुधवार, २० फेब्रूवारी रोजी करण्यात आली.
प्राप्त माहितीनुसार, तक्रारदाराकडून प्राप्त व्यवसाय कर्ज मंजूरीच्या फाईलला मान्यता देण्यासाठी वसूली निरीक्षक योगेश चव्हाण याने सहा हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. तडजोडीअंती त्यापैकी पाच हजारांची रक्कम स्विकारताना लाचलुचपत विभागाने चव्हाणला रंगेहात जेरबंद केले. ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक डोंगरदिवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपअधिक्षक राहुल गांगुर्डे, सहायक पोलिस उपनिरीक्षक नंदकिशोर परळकर, पोलिस हवालदार दिलीप बेलोकर, पोलिस नाईक विनोद अवगळे यांनी केली.