दिव्यांगाच्या योजना त्यांच्यापर्यंत  पोहोचल्या पाहिजे ! - मनिष डांगे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2017 01:32 PM2017-12-05T13:32:51+5:302017-12-05T13:33:49+5:30

वाकद : दिव्यांगाना आपल्या योजनापासून अनभिज्ञ व वंचित राहावे लागते. त्यामुळे   प्रत्येक दिव्यांगापर्यंत योजना पोहोचल्या पाहिजे  तसेच दिव्यागांनी योजनाची माहिती घेवुन त्यांच्या लाभ घ्यावा असे आवाहन राष्ट्रीय अपंग विकास महासंघाचे म.रा.उपाध्यक्ष मनिष डांगे यांनी वाकद येथे केले. 

Divyang's plans should reach them! - Manish Dange | दिव्यांगाच्या योजना त्यांच्यापर्यंत  पोहोचल्या पाहिजे ! - मनिष डांगे

दिव्यांगाच्या योजना त्यांच्यापर्यंत  पोहोचल्या पाहिजे ! - मनिष डांगे

googlenewsNext
ठळक मुद्देवाकद येथे कार्यक्रम

वाकद : दिव्यांगाच्या सर्वांगीण विकासासाठी  त्याना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासनाकडून विविध योजना दाखविल्या जातात, मात्र  अधिकारी,कर्मचारी यांच्या निष्काळजीपणामुळे शेवटच्या घटकापर्यंत पोहोचत नाहीत व दिव्यांगाना आपल्या योजनापासून अनभिज्ञ व वंचित राहावे लागते. त्यामुळे   प्रत्येक दिव्यांगापर्यंत योजना पोहोचल्या पाहिजे  तसेच दिव्यागांनी योजनाची माहिती घेवुन त्यांच्या लाभ घ्यावा असे आवाहन राष्ट्रीय अपंग विकास महासंघाचे म.रा.उपाध्यक्ष मनिष डांगे यांनी वाकद येथे केले. 

४ डिसेंबर रोजी वाकद येथे शाखा स्थापन प्रसंगी आयोजित मेळाव्यात कार्यक्रमाचे अध्यक्ष  म्हणुन ते बोलत होते.  कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणुन राज्य संचालीका वंदना ठाकुर , रिसोड  तालुकाध्यक्ष धनिराम बाजड, पिंटु इंगोले,  ग्रामविकास अधिकारी काकडे,  पं.स.माजी उपसभापती अकील सै.हुसेन, सागर जमधाडे, भिकाजी अंभोरे, अयुब भाई आदिंची उपस्थिती होती.  स्थानिक स्वराज्य संस्थामधील उत्पन्नातील ३ टक्के निधी दिव्यागांच्या बँक खात्यात जमा करण्याचे शासनाचे परिपत्रक असल्याचे त्यांनी सांगितले.  यावेळी धनिराम बाजड, सै.अकीलभाई यांनीही महत्वपूर्ण मार्गदर्शन केले. ग्रामविकास अधिकारी काकडे यांनी दिव्यागांच्या योजनाबाबत माहिती सांगुन दिव्यागांच्या योजना राबविण्यासाठी ग्रा.पं. सदैव तत्पर असल्याचे सांगितले.  कार्यक्रमास  शाखाध्यक्ष  पंजाब अंभोरे, उपाध्यक्ष शे.तस्लीम  शे.लतीफ, सचिव देवानंद अंभोरे, भानुदास तिरके,  कोषााध्यक्ष  कैलास अंभोेरे, सदस्य भगवान बेंडवाले,भास अंभोरे, समीर खॉ, नाजीर खॉ, पठाण, शे.शौकत शे.यासीन, अशोक साठे, ज्ञानबा तिरके, तुकाराम इंगळे,  तथा दिव्यांग बांधव व बहूसंख्य महिला कार्यक्रमास उपस्थित होत्या. कार्यक््रमाचे संचालन संतोष साठे यांनी केले व आभार संजय मोरे यांनी मानले.

Web Title: Divyang's plans should reach them! - Manish Dange

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.