दिवाळीत मेंढयांचे लग्न लावून केली जाते पूजा
By Admin | Published: October 29, 2016 01:24 PM2016-10-29T13:24:59+5:302016-10-29T13:24:59+5:30
दिवाळीतील पाडव्याच्या दिवशी हे मेंढपाळ एक नर आणि एक मादी अशा मेंढयांच्या जोडयांना स्वच्छ आंघोळ घालतात. लोकरीचे तीन गोफ करतात. पाडव्याच्या पहाटे या मेंढयांचे लग्न लावले जाते
>ऑनलाइन लोकमत
वाशिम, दि. 29 - धनगरांचे धन म्हणजे मेंढया. दिवाळीतील पाडव्याच्या दिवशी हे मेंढपाळ एक नर आणि एक मादी अशा मेंढयांच्या जोडयांना स्वच्छ आंघोळ घालतात. लोकरीचे तीन गोफ करतात. पाडव्याच्या पहाटे या मेंढयांचे लग्न लावले जाते. धनगरांचा पुजारी वीरकर मेंढयांच्या लेंडयांच्या पाच लक्ष्मी तयार करतो. या लक्ष्मीची संरक्षणाकरिता वापरल्या जाणा-या काठीची यावेळी पूजा केली जाते. हळकुंड बांधलेला गोफ मादीच्या, तर पानसुपारीचा गोफ नराच्या गळयात बांधला जातो. तिसरा गोफ मालकाच्या हातात बांधला जातो. यावेळी कळपातील मोठाएडका आणि राखणदार कुत्र्याचीही पुजा केली जाते. फड, तुणतुणं वाजवून खंडोबाची आरती केली जाते.