संगणक परिचालकांची दिवाळी जाणार अंधारात !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2020 05:13 PM2020-11-10T17:13:35+5:302020-11-10T17:15:32+5:30

Washim News मानधन मिळण्याच्या दृष्टिने प्रशासनाकडून कोणत्याही हालचाली नसल्याने संगणक परिचालकांची दिवाळी अंधारात जाण्याची शक्यता आहे. 

Diwali of computer operators will go in the dark! | संगणक परिचालकांची दिवाळी जाणार अंधारात !

संगणक परिचालकांची दिवाळी जाणार अंधारात !

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम - ‘आपले सरकार प्रकल्पा’च्या माध्यमातून ग्रामपंचायत स्तरावर कार्यरत अनेक संगणक परिचालकांना गत  चार वर्षांपासून मानधन मिळाले नाही. दिवाळीच्या ऐन तोंडावरही मानधन मिळण्याच्या दृष्टिने प्रशासनाकडून कोणत्याही हालचाली नसल्याने संगणक परिचालकांची दिवाळी अंधारात जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. 
राज्याच्या ग्राम विकास विभागांतर्गत ग्रामपंचायतींमध्ये ‘आपले सरकार’ प्रकल्प राबविण्यात येत आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून ग्रामपंचायत स्तरावर संगणक परिचालक कार्यरत आहेत. हा प्रकल्प राबविणाऱ्या कंपनीच्या चुकीचा धोरणाचा फटका संगणक परिचालकांच्या मानधनाला बसत असल्याचा आरोप संघटनेचे वाशिम तालुकाध्यक्ष शेखर हिरगुडे यांनी निवेदनाद्वारे केला. २०१७ ते ऑक्टोबर २०२० पर्यंतचे मानधन शासनाकडे थकीत आहे. संगणक परिचालकांना वर्ष वर्ष मानधन मिळत नाही. कंपनीच्या चुकीच्या धोरणामुळे सीएससी-आयडी तसेच ‘झिरो अमाऊंट कॅल्क्युलेट’च्या नावाखाली संगणक परिचालकांना मानधन दिले जात नाही. अनेकांचे फक्त पॅन कार्ड नसल्याचे कारण देत प्रती महिना १२०० रुपये मानधन कपात करण्यात आले. हा एकप्रकारे संगणक परिचालकांवर अन्याय असून, या अन्यायाविरोधात दिवाळीदरम्यान जिल्हा परिषद कार्यालयासमोर आंदोलन छेडण्याचा इशाराही संगणक परिचालक संघटनेने निवेदनाद्वारे दिला. कोरोना काळात संगणक परिचालकांनी कोविड योद्धा म्हणून काम केले आहे. परंतु शासनाकडून १००० रुपये भत्ता सुद्धा मिळाला नाही. या दिवाळीपुर्वी सर्व थकीत मानधन देण्यात यावे अन्यथा जिल्हा परिषदेसमोर निदर्शने करून ‘शिमगा आंदोलन’ करणार असल्याचे हिरगुडे यांनी सांगितले.

Web Title: Diwali of computer operators will go in the dark!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :washimवाशिम