हतबल होऊ नका, शासन तुमच्या सोबत आहे : दिवाकर  रावतेंनी साधला वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांशी संवाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2018 05:46 PM2018-02-16T17:46:44+5:302018-02-16T17:49:29+5:30

गारपिटीमुळे शेतकऱ्यांवर कोसळलेल्या संकटात शासन शेतकcच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून शेतकऱ्यांनी हतबल न होण्याचे आवाहन परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी शुक्रवारी केले.

Do not be weak, Governance is with you: Diwakar Rawate | हतबल होऊ नका, शासन तुमच्या सोबत आहे : दिवाकर  रावतेंनी साधला वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांशी संवाद

हतबल होऊ नका, शासन तुमच्या सोबत आहे : दिवाकर  रावतेंनी साधला वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांशी संवाद

Next
ठळक मुद्देसर्वप्रथम रावते यांनी कोयाळी येथील शेतकरी विठ्ठल शेळके यांच्या हरभरा पिकाचे गारपिटीने झालेल्या नुकसानाची शेतात जाऊन पाहणी केली. केंद्र सरकारकडूनही २०० कोटी रुपयांची मदत मिळविण्यासाठी प्रस्ताव पाठविण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

वाशिम : अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे फळबागांसह पिकांचे प्रचंड नुकसान झाले. या नुकसानाचे तातडीने पंचनामे करून शासनाने मदत जाहीर केली आहे. केंद्र सरकारकडूनही मदत मिळविण्यासाठी प्रस्ताव पाठविण्यात येणार आहे. गारपिटीमुळे शेतकऱ्यांवर कोसळलेल्या संकटात शासन शेतकºयांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून शेतकºयांनी हतबल न होण्याचे आवाहन परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी शुक्रवारी केले. रिसोड तालुक्यातील कोयाळी (जाधव) येथे गारपिटीने झालेल्या नुकसानाची पाहणी केल्यानंतर शेतकऱ्यांशी संवाद साधताना ते बोलत होते.

याप्रसंगी जिल्हा परिषदेच्या कृषि व पशुसंवर्धन समितीचे सभापती विश्वनाथ सानप, तहसीलदार आर. यू. सुरडकर, रिसोड पंचायत समितीचे उपसभापती महादेव ठाकरे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते. सर्वप्रथम रावते यांनी कोयाळी येथील शेतकरी विठ्ठल शेळके यांच्या हरभरा पिकाचे गारपिटीने झालेल्या नुकसानाची शेतात जाऊन पाहणी केली. तसेच परिसरातील शेतकºयांशी संवाद साधला.

यावेळी बोलताना रावते म्हणाले, गेल्या काही वर्षांमध्ये हवामानातील बदलांमुळे अवेळी पाऊस, गारपिटीचे संकट वारंवार येत असून त्यामुळे शेतकºयांचे नुकसान होत आहे. आताही गेल्या दोन-तीन दिवसात विदर्भ, मराठवाड्यात झालेल्या गारपिटीने गहू, हरभरा पिकांसह फळबागांचेही प्रचंड नुकसान झाले आहे. या नुकसानाची शासनाला जाणीव असून शेतकº्यांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी आपण शेतकºयांच्या बांधावर जाऊन त्यांच्याशी संवाद साधत असल्याचे रावते यांनी सांगितले.

गारपीटग्रस्त पिकांच्या नुकसानाची तातडीने दखल घेऊन कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी तत्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिले होते. त्याआधारे शासनाने एनडीआरएफच्या नियमानुसार शेतकºयांना तातडीने मदत जाहीर केली असून ही मदत लवकरात लवकर शेतकºयांपर्यंत पोहोचविण्यासाठी शासनाचे प्रयत्न आहेत. तसेच केंद्र सरकारकडूनही २०० कोटी रुपयांची मदत मिळविण्यासाठी प्रस्ताव पाठविण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. शेतकºयांवर येणाºया प्रत्येक संकटात त्यांना मदतीचा हात देण्यासाठी राज्य शासन नेहमीच कटिबद्ध असून शेतकºयांनी कोणत्याही संकटामुळे हतबल होऊ नये, असे आवाहनही रावते यांनी केले.

Web Title: Do not be weak, Governance is with you: Diwakar Rawate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.