कला क्षेत्रातील सवलतीच्या गुणांपासून विद्यार्थ्यांना वंचित ठेवू नका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2021 04:42 AM2021-04-01T04:42:19+5:302021-04-01T04:42:19+5:30

दिलेल्या निवेदनात नमूद आहे की, शालेय शिक्षण विभागाच्या २४ नोव्हेंबर २०१७ च्या शासन निर्णयानुसार शास्त्रीय कला चित्रकला लोककलेत प्राविण्य ...

Do not deprive students of concessionary marks in the field of art | कला क्षेत्रातील सवलतीच्या गुणांपासून विद्यार्थ्यांना वंचित ठेवू नका

कला क्षेत्रातील सवलतीच्या गुणांपासून विद्यार्थ्यांना वंचित ठेवू नका

Next

दिलेल्या निवेदनात नमूद आहे की, शालेय शिक्षण विभागाच्या २४ नोव्हेंबर २०१७ च्या शासन निर्णयानुसार शास्त्रीय कला चित्रकला लोककलेत प्राविण्य प्राप्त करणार्‍या विद्यार्थ्यांना माध्यमिक परीक्षा २०२१मध्ये देणार्‍या विद्यार्थ्यांना त्यांच्या सुविधेकरिता ग्रेस गुण देण्यासंदर्भात निर्देशित करण्यात आले आहे. त्यानुसार महाराष्ट्र शासनाच्या कला संचालनालयाच्या वतीने एलिमेंटरी व इंटरमिजिएट या दोन्ही परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर चित्रकला क्षेत्रातील प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांना त्यांच्या सुविधांसाठी अतिरिक्त गुण मिळत आहेत. मात्र, कोरोना संसर्ग संकटामुळे राज्यातील सर्व शाळा बंद असल्यामुळे कला संचालनालयाच्या या दोन्ही परीक्षा घेण्यात आल्या नाहीत. त्यामुळे यावर्षी जे विद्यार्थी माध्यमिक शालांत परीक्षेला बसले आहेत व ज्यांनी एलिमेंटरी ग्रेड परीक्षा उत्तीर्ण केली आहे, असे विद्यार्थी अतिरिक्त गुणांपासून वंचित राहू नयेत, म्हणून चित्रकला क्षेत्रातील सुविधेसाठी गुण देण्यात यावेत, यासाठी महाराष्ट्र राज्य कला शिक्षक महासंघाने गेल्या चार महिन्यात राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड, बच्चू कडू व कला संचालक यांना प्रत्यक्ष भेटून आतापर्यंत दहा निवेदने देण्यात आली आहेत. याबाबत सकारात्मक निर्णय घेण्याची ग्वाही शिक्षणमंत्र्यांनी त्यावेळी दिली होती. परंतु याबाबत कोणताही सकारात्मक निर्णय घेण्यात आला नाही. त्यामुळे संपूर्ण राज्यात विद्यार्थी, पालक, कलाशिक्षक, संघटनेचे पदाधिकारी यांनी रोष व्यक्त केला आहे. अतिरिक्त गुण प्राप्त करण्याच्या सुविधेपासून विद्यार्थ्यांना वंचित ठेवणारा उच्च व तांत्रिक शिक्षण विभागाने काढलेला २६ मार्च २०२१ रोजीचा आदेश तत्काळ रद्द करण्यात यावा, अशी मागणी महाराष्ट्र राज्य कलाशिक्षक महासंघाच्या वतीने केली आहे.

निवेदन देताना महाराष्ट्र राज्य कला शिक्षक महासंघाचे विभागीय उपाध्यक्ष जगदीश नखाते, जिल्हाध्यक्ष अमोल काळे, जिल्हा सचिव गोपाल गावंडे, सहसचिव प्रकाश कुटे, जिल्हा महिला प्रतिनिधी कीर्ती सातव, प्रतीक्षा वानखेडे, राम काटे, संतोष बायस्कर, संजीव कचरे, अविनाश श्रीखंडे, प्रसिद्धीप्रमुख जोगेंद्र वैद्य व संघटनेचे अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

Web Title: Do not deprive students of concessionary marks in the field of art

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.