मुले पळविणाऱ्या टोळीविषयीच्या अफवांवर विश्वासू ठेवू नका - पोलिसांचे आवाहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2018 06:42 PM2018-07-02T18:42:20+5:302018-07-02T18:48:11+5:30
वाशिम : सध्या व्हाट्सअप व इतर सोशल मीडियाद्वारे मुले पळवून नेणारी टोळी, चोरी याविषयी अफवा पसरविल्या जात असल्याचे दिसून येत आहे. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होत असून केवळ संशयातून मारहाणीसारखे गंभीर गुन्हे घडत आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : सध्या व्हाट्सअप व इतर सोशल मीडियाद्वारे मुले पळवून नेणारी टोळी, चोरी याविषयी अफवा पसरविल्या जात असल्याचे दिसून येत आहे. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होत असून केवळ संशयातून मारहाणीसारखे गंभीर गुन्हे घडत आहेत. नागरिकांनी सोशल मीडिया अथवा इतर माध्यमातून पसरविल्या जाणाºया अफवांवर विश्वासू ठेवू नये, असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी सोमवारी केले.
मुले पळवून नेणाºया टोळीविषयी व्हाट्सअपसारख्या माध्यमातून अफवा पसरवून समाजात भीतीचे वातावरण करण्याचा प्रकार सध्या निदर्शनास आहे. त्यामुळे गावात, शेतवस्तीवर येणारे अपरिचित, मनोरुग्ण, भटके साधू वेशातील लोक यांना संशयावरून मारहाण करण्याचे प्रकार घडत असून नागरिकांनी कोणत्याही अफवांना बळी पडू नये. तसेच अशाप्रकारचे संदेश खात्री न करता पाठवू नयेत. अफवा पसरवून समाजातील शांतता व सुव्यवस्था धोक्यात आणणे हा सुद्धा एक प्रकारचा गंभीर गुन्हा आहे. तसेच संशयित इसमांना मारहाण न करता त्वरित आपल्या गावातील पोलीस पाटील, जिल्हा पोलीस नियंत्रण कक्षाच्या ०७२५२-२३४८३४ या क्रमांकावर अथवा नजीकच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधून माहिती द्यावी. पोलीस प्रशासन नागरिकांच्या मदतीसाठी सदैव तत्पर असल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी कळविले आहे.