निर्भिडपणे मतदान करावे

By admin | Published: September 17, 2014 01:14 AM2014-09-17T01:14:57+5:302014-09-17T01:14:57+5:30

पत्रकार परिषदेत कारंजा लाड येथील तहसीलदार उंबरकर यांचे आवाहन.

Do not vote freely | निर्भिडपणे मतदान करावे

निर्भिडपणे मतदान करावे

Next

कारंजालाड: आगामी विधानसभा निवडणुक ीत मतदारांनी निर्भिडपणे मतदान करावे, असे आवाहन कारंजालाड येथील तहसीलदार श्रीकांत उंबरकर यांनी केले. तहसील कार्यालयात मंगळवार १६ सप्टेंबर रोजी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
तहसील कार्यालयात निवडणुकीत आदर्श आचार संहितेचे पालन करण्यासंदर्भात मार्गदर्शन क रण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेला संबोधित करताना तहसीलदार उंबरकर यांनी आगामी विधानसभा निवडणुक ीसाठी प्रशासनाच्या तयारीविषयी माहिती दिली. स्थीर पथके, फिरती पथके, सर्वेक्षण पथके, एक अधिकारी, तीन पोलिस कर्मचारी राहतील, तसेच उमेदवाराच्या खर्चावर देखरेखीसाठी लेखा पथकाची स्थापना करण्यात आली आहे. प्रत्येक पथकाबरोबर एक व्हिडीओ पथक राहिल.लोकसभा निवडणुकीतील उणीवा लक्षात घेताविधानसभा निवडणुकीत गफ लत होऊ नये म्हणून व्हिडीओग्राफर्सना प्रशिक्षणही देण्यात आले आहे. संवेदनशील गावासाठी पोलिस व प्रशासकीय यंत्रणा सज्ज राहिल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Web Title: Do not vote freely

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.