पाण्याअभावी सुकलेल्या पिकाचे सर्वेक्षण करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2017 07:28 PM2017-08-16T19:28:11+5:302017-08-16T19:29:14+5:30
मंगरुळपीर: पावसाने महिनाभरापासून दडी मारल्याने तालुक्यावर दुष्काळाचे सावट ओढवल्याचे दिसत आहे. पावसाअभावी पीक नुकसान होऊन शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. ही बाब लक्षात घेऊन शासनाने तालुक्यातील पिकाचे सर्वेक्षण करून प्रत्येक शेतकºयाला लागलेल्या खर्चापोटी किमान ५० हजार तातडीची मदत जाहीर करावी, अशा मागणीचे निवेदन जिल्हा राष्ट्रवादी युवक काँंग्रेसच्यावतीने १६ आॅगस्ट रोजी मंगरुळपीरच्या तहसीलदारांना देण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क

तहसीलदारांना दिलेल्या निवेदनाचा आशय, असा की मंगरुळपीर तालुुक्यात पावसाने अद्यापही सरासरी गाठली नसून, पावसाअभावी कोळंबी, दाभा, लावणा, वरूड, कळंबा, धानोरा, सावरगांव, दस्तापूर, कासोळा, जांब, पारवासह तालुक्यातील सर्वच भागात सोयाबीन, तूर, मुग, ऊडिद आदि पिके सुकली आहे. या पिकांसाठी शेतकºयांनी डवरणी वखरणी, पेरणी ते फवारणीपर्यंत अंदाजे लाखाचे वर गुंतवणूक केली. शेतकºयांना नैसर्गिक संकटात मदतीचा हात देऊन शेतकरी आत्महत्येचे सत्र थांबविण्यासाठी विद्यमान शासनाने तहसिलदारांना आदेशित करून तलाठी मंडळ अधीकारी व कृषी विभागाव्दारे सर्वेक्षण करावे आणि शेतसाठी आलेल्या खर्चापोटी किमान ५० हजार रूपयांची तातडीची मदत द्यावा, अन्यथा शासनाच्या विरोधात तहसील कार्यालया समोर धरणे आंदोलन करून लक्ष वेधल्या जाईल, असा इशारा या निवेदनातून देण्यात आला आहे. या निवेदनावर अनंता काळे, आनंद राऊत, अमिन चव्हाण, देवा चव्हाण, विशाल खांडेकर, अनिकेत चव्हाण, निलेश गावंडे, शाम अवताडे, विशाल धानोरकर, विश्वनाथ आटपडकर, प्रेमसिंग राठोड, अरुण चव्हाण, वृषभ चव्हान, सचिन राऊत, किशोर राऊत, संतोष खाडे, रोशन चव्हाण यांच्यासह शेतकºयांच्या स्वाक्षºयांच्या स्वाक्षºया आहेत.