ग्रामीण रूग्णालयात ‘डॉक्टर डे’ साजरा
By Admin | Published: July 3, 2014 11:46 PM2014-07-03T23:46:13+5:302014-07-03T23:46:13+5:30
शासकीय ग्रामीण रूग्णालयात ‘डॉक्टर डे’ मोठय़ा उत्साहात साजरा करण्यात आला.
मंगरूळपीर : येथील शासकीय ग्रामीण रूग्णालयात १ जुलै रोजी ह्यडॉक्टर डेह्ण डॉ.गजानन पाटील हरणे यांचे अध्यक्षतेखाली मोठय़ा उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी प्रमुख अतिथी म्हणून डॉ.महाकाळ, डॉ.आडे, डॉ.प्रीती तिडके, डॉ.अजमल वहिद, डॉ.विनोद इंगळे यांच्या उपस्थितीत रूग्णांना तपासून आरोग्याविषयी सल्ला देवून रूग्णांचे पुष्पगुच्छ देऊन अध्यक्षीय भाषणात डॉ.हरणे यांनी उपस्थितांना उपयुक्त केले की, लोकांच्या जीवाला जपण्याकरिता ईश्वराने केलेली व्यवस्था म्हणजे डॉक्टर. तरी यांनीही रूग्ण व इतरांनी आमचेकरिता काही करायला पाहिजे असे स्वार्थ न ठेवता रूग्ण हेच आमचे ईश्वर असून त्यांना सेवा देण्याचे कार्य आम्ही साधतो. ज्यामुळे डॉक्टर असल्याचा आम्हाला अभिमान वाटतो.
यावेळी रूग्णालयाचे कर्मचारी प्रकाश संगत, इन्चार्ज सिस्टर उइके, देवेन्द्र परदेशी, बिकट, शितल अंबुलकर, राजू महल्ले, गजू चतारे, रामदास चतारे, राजू यादव सह सर्व कर्मचारी वृंद उपस्थित होते.