डॉक्टर कोरोनाच्या विळख्यात आरोग्य सेवा होतेय प्रभावित !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2020 12:08 PM2020-09-06T12:08:04+5:302020-09-06T12:09:28+5:30

आतापर्यंत २५ जणांना कोरोना संसर्ग झाला असून गत चार, पाच दिवसात १० जण कोरोनाबाधित झाले.

Doctor get Corona afected; health care is affected! | डॉक्टर कोरोनाच्या विळख्यात आरोग्य सेवा होतेय प्रभावित !

डॉक्टर कोरोनाच्या विळख्यात आरोग्य सेवा होतेय प्रभावित !

Next

वाशिम : जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत असतानाच, डॉक्टर, कर्मचाऱ्यांना कोरोनाचा संसर्ग होत असल्याने आरोग्य सेवाही काही प्रमाणात प्रभावित होत असल्याचे दिसून येते. आतापर्यंत २५ जणांना कोरोना संसर्ग झाला असून गत चार, पाच दिवसात १० जण कोरोनाबाधित झाले. त्यांच्या संपर्कातील जवळपास १५ जणांचे थ्रोट स्वॅब नमुने तपासणीसाठी घेण्यात आले.
जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने जिल्हावासियांची चिंताही वाढली. कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी जिल्हा सामान्य रुग्णालय, स्त्री रुग्णालयातील कोविड केअर सेंटर तसेच तालुकास्तरावर कोविड केअर सेंटरची सुविधा उपलब्ध आहे. जिल्ह्यात आरोग्य अधिकारी, कर्मचाऱ्यांची एकूण ४४९ पदे रिक्त आहेत. आरोग्य विभागातही कोरोनाचा शिरकाव झाला असून, सरकारी व खासगी रुग्णालयातील जवळपास २५ जणांना आतापर्यंत कोरोनाचा संसर्ग झाला. यामध्ये डॉक्टर आणि कर्मचाºयांचाही समावेश आहे. एकिकडे नागरिकांना मोठ्या संख्येने कोरोना संसर्ग होत असतानाच, दुसरीकडे डॉक्टर, कर्मचाºयांनाही कोरोनाचा संसर्ग होत असल्याने आरोग्य सेवा काही अंशी प्रभावित होत आहे. या पृष्ठभूमीवर जिल्ह्यात अधिकारी, कर्मचाºयांची रिक्त पदे भरणे, जिल्हा सामान्य रुग्णालय व कोविड केअर सेंटरमध्ये ‘फिजिशियन’ची आणखी काही पदे निर्माण करणे आवश्यक ठरत आहे. खासगी डॉक्टरांची सेवा घेण्याची तयारीही प्रशासनातर्फे सुरू आहे. याला कितपत यश येते, हे लवकरच स्पष्ट होईल.
 
कोरोनावर मात करताच ‘एकमेक’ फिजिशयन सेवेत रूजू

जिल्हा सामान्य रुग्णालयात एकमेव फिजियशन आहेत. कोरोनाबधित रुग्णांवर निगराणी, उपचार करण्याची धुरा ते सांभाळत आहेत. मध्यंतरी त्यांनाही कोरोना संसर्ग झाला होता. कोरोनावर मात करताच ते पुन्हा रुग्णसेवेत रूजू झाले. जिल्ह्याचे ठिकाणी असलेल्या वाशिम जिल्हा सामान्य रुग्णालयात कोरोनाच्या काळात आणखी दोन ते तीन फिजिशियन असणे आवश्यक ठरत आहे.


‘कॉल आॅन’ संदर्भात चर्चा
एकिकडे कोरोनाबाधित रुग्णसंख्या वाढत आहे तर दुसरीकडे आरोग्य विभागातही कोरोनाचा शिरकाव झाल्याने काही अंशी आरोग्य सेवा प्रभावित होत आहे. अशा परिस्थितीत जिल्ह्यातील खासगी डॉक्टरांची सेवा ‘कॉल आॅन’ स्वरुपात उपलब्ध करून घेण्याबाबत आरोग्य विभागाची डॉक्टरांच्या संघटनेसोबत चर्चा सुरू आहे.


जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. उपलब्ध मनुष्यबळ आणि सुविधा यानुसार रुग्णांवर उपचार केले जात आहेत. कोरोनाच्या काळात ‘कॉल आॅन’ स्वरुपात खासगी डॉक्टरांची सेवा घेण्याच्या सूचना पालकमंत्री महोदयांनी केल्या. त्यानुसार ‘आयएमए’शी चर्चा सुरू आहे.
- डॉ. अंबादास सोनटक्के
जिल्हा शल्य चिकित्सक, वाशिम

Web Title: Doctor get Corona afected; health care is affected!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.