‘एनसीआयएसएम’ विधेयकाविरूद्ध वाशिम येथील डॉक्टरांनी पुकारला संप!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 3, 2017 07:14 PM2017-11-03T19:14:02+5:302017-11-03T19:15:35+5:30
वाशिम: आयुर्वेद, युनानी आणि सिद्ध या भारतीय चिकित्सा पद्धतीच्या चिकित्सकांच्या ‘निमा’ संघटनेने प्रस्तावित ‘एनसीआयएसएम’ विधेयकाविरूद्ध ६ नोव्हेंबरला देशव्यापी संप पुकारला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम: आयुर्वेद, युनानी आणि सिद्ध या भारतीय चिकित्सा पद्धतीच्या चिकित्सकांच्या ‘निमा’ संघटनेने प्रस्तावित ‘एनसीआयएसएम’ विधेयकाविरूद्ध ६ नोव्हेंबरला देशव्यापी संप पुकारला आहे. याच अनुषंगाने दिल्ली येथे भव्य मोर्चा निघणार असून त्यात वाशिम जिल्ह्यातील १०० पेक्षा अधिक आयुर्वेद, युनानी आणि सिद्ध चिकित्सक सहभागी होणार आहेत; तर अन्य पदवीधारक आपले क्लिनिक, रुग्णालये ५ ते ७ नोव्हेंबर असे तीन दिवस कडकडीत बंद ठेवणार असल्याची माहिती निमा संघटनेच्या सदस्यांनी दिली.
एनसीआयएसएम विधेयकामुळे भारतीय चिकित्सा पद्धती जीवंत ठेवणाºया डॉक्टरांना त्यांचे अनेक कायदेशीर अधिकार गमवावे लागणार आहेत. निती आयोगाव्दारे हा कायदा पारित केला असून त्याच्याविरोधात निमा संघटनेने बंड पुकारला आहे. त्यामुळे ५ ते ७ नोव्हेंबर या कालावधीत कडकडीत बंद आणि दिल्ली येथे मोर्चा निघणार आहे. त्यात उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे, असे आवाहन येथील संघटनेचे डॉ. सुधाकर जिरोणकर, डॉ. अजय राठोड, डॉ. सागर आंबेकर, डॉ. धनंजय शेळके, डॉ. कैलास दागडिया, डॉ. वि.वि. देशमुख, डॉ. अमोल नरवाडे यांच्यासह इतर सदस्यांनी केले आहे.