पहिल्या टप्प्यात कोरोनाची लस घेण्यास डॉक्टर, आरोग्य कर्मचारी उत्सुक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 06:09 AM2021-01-08T06:09:52+5:302021-01-08T06:09:52+5:30
देशात मार्च महिन्यापासून कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढला. जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यात कोरोनाचा उद्रेक झाला होता. नोव्हेंबर महिन्यापासून कोरोनाचा ...
देशात मार्च महिन्यापासून कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढला. जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यात कोरोनाचा उद्रेक झाला होता. नोव्हेंबर महिन्यापासून कोरोनाचा आलेख खाली येत आहे. दरम्यान, जानेवारी महिन्यात कोरोनाची लस उपलब्ध होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. यासाठी जिल्ह्यात फ्रंटलाइन वर्कर्स म्हणून सरकारी व खासगी क्षेत्रातील ५३२४ वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांची नोंदणी झाली आहे. यामध्ये सरकारी डाॅक्टर व कर्मचाऱ्यांची संख्या ३८९०, तर खासगी डाॅक्टर व कर्मचाऱ्यांची संख्या १४३४ अशी आहे. कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारी डाॅक्टर, कर्मचाऱ्यांनी अहोरात्र मेहनत घेतली. या फ्रंटलाइन वर्कर्सला पहिल्या टप्प्यात कोरोनाची लस देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. दरम्यान, कोरोना लसीचे काही साइड इफेक्ट होऊ शकतात, अशी भावना अन्य जिल्ह्यातील काही डाॅक्टर, कर्मचाऱ्यांची झाल्याने पहिल्या टप्प्यात लस घेण्याची धाकधूक आहे. हा धागा पकडून जिल्ह्यातील सरकारी व खासगी डाॅक्टरांची मते जाणून घेतली असता, पहिल्या टप्प्यात कोरोना लस घेण्यास काहीच हरकत नसल्याचे डाॅक्टरांनी सांगितले.
०००००
वाशिम जिल्ह्यात जून ते सप्टेंबर या महिन्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढली. त्यानंतर कोरोनाबाधितांच्या संख्येत चढ-उतार दिसून येतात. अलीकडच्या काळात कोरोनाचा आलेख खाली आला आहे. कोरोना लस लवकरच येणार, असे सांगण्यात येत आहे. कोरोना लस घेण्यास जिल्ह्यात कुणाचाही विरोध नाही.
- डाॅ. अनिल कावरखे, इंडियन मेडिकल असोसिएशन अध्यक्ष
०००
आगामी काळात कोरोना लस उपलब्ध होण्याच्या दृष्टिकोनातून वरिष्ठांच्या मार्गदर्शनात नियोजन केले जात आहे. जिल्ह्यात ३५ शीत साखळी केंद्रे आहेत. सरकारी व खासगी डाॅक्टर, आरोग्य कर्मचाऱ्यांची कोरोना लसीकरणासाठी नोंदणी झाली आहे.
- डाॅ. अविनाश आहेर
जिल्हा आरोग्य अधिकारी
०००
५३२६
जिल्ह्यात डॉक्टर,
००
५३२६
आरोग्य कर्मचाऱ्यांनी लससाठी नोंदणी केली