खासगी दवाखाने सुरु ठेवण्याचा डॉक्टर संघटनेचा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2020 10:48 AM2020-03-28T10:48:24+5:302020-03-28T10:48:35+5:30

सर्व डॉक्टरांचे दवाखाने २७ मार्चपासून सुरु ठेवण्याचा निर्णय तिन्ही संघटनानी शुक्रवारी घेतला.

Doctors Association's decision to continue private clinics | खासगी दवाखाने सुरु ठेवण्याचा डॉक्टर संघटनेचा निर्णय

खासगी दवाखाने सुरु ठेवण्याचा डॉक्टर संघटनेचा निर्णय

Next

वाशिम : जिल्ह्यातील खासगी दवाखाने बंद असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्याने जिल्ह्यातील सर्व खासगी डॉक्टरांनी आपले दवाखाने नियमितपणे सुरु ठेवावे, असे आवाहन जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक यांनी आयएमए, निमा व आयडीए संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत केले. या आवाहनाला प्रतिसाद देत जिल्ह्यातील आयएमए, निमा व आयडीए संघटनेशी संबंधित सर्व डॉक्टरांचे दवाखाने २७ मार्चपासून सुरु ठेवण्याचा निर्णय तिन्ही संघटनानी शुक्रवारी घेतला.


स्वतंत्र आदेश निर्गमित
आय.एम.ए., निमा आणि आय.डी.ए. संघटनेने खासगी दवाखाने सुरु ठेवण्याबाबत घेतलेल्या निर्णयाची त्यांच्या सर्व सदस्य डॉक्टरांनी अंमलबजावणी करून आपले दवाखाने सुरु ठेवावेत. या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाने २७ मार्चला स्वतंत्र आदेश निर्गमित केला.


पडताळणी होणार
किती दवाखाने उघडे आहेत, याची पडताळणी केली जाईल. जे डॉक्टर आपले दवाखाने पूर्ववत सुरु ठेवणार नाहीत, त्यांच्याबाबतीत जिल्हा प्रशासनाला नाईलाजाने कठोर पावले उचलावी लागतील. खासगी दवाखाने सुरु ठेवण्यासाठी डॉक्टरांना काही अडचणी येत असतील तर त्यांनी संबंधित तहसीलदार अथवा जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधावा, असे जिल्हाधिकारी मोडक यांनी स्पष्ट केले.

Web Title: Doctors Association's decision to continue private clinics

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.