उपजिल्हा रुग्णालयात डाॅक्टरांनी नियमित सेवा द्यावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2021 04:40 AM2021-04-18T04:40:26+5:302021-04-18T04:40:26+5:30
कोरोनाच्या काळात सुध्दा कारंजा उपजिल्हा रुग्णालयाकडून रुग्णांना योग्य सेवा दिली जात नसल्याचा आरोप मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी केली. कारंजा येथील उपजिल्हा ...
कोरोनाच्या काळात सुध्दा कारंजा उपजिल्हा रुग्णालयाकडून रुग्णांना योग्य सेवा दिली जात नसल्याचा आरोप मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी केली. कारंजा येथील उपजिल्हा रुग्णालयात १६ एप्रिल रोजी भेट दिली असता यावेळी वैद्यकीय अधीक्षक डाॅ नथुराम साळुुंके यांनी या रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी वर्ग २ ची १२ पदे मंजूर असून ११ पदे भरण्यात आली. त्यामधील दोन डाॅक्टरांना कामरगाव व यवतमाळ येथे वर्ग करण्यात आले. तीन डाॅक्टर हे अनाधिकृतपणे गैरहजर तर एक डाक्टर प्रसूती रजेवर आहे, असे डाॅ. साळुुंके यांनी सांगितले. यावेळी मनसे पदाधिकाऱ्यांना दिली. तसेच रुग्णालयात कोरोना रुग्णसुध्दा परिसरात मुक्त संचार करीत आहे. पिण्याच्या पाण्याची सुविधा नसून या उपजिल्हा रुग्णालयाच्या मोठ्या प्रमाणात तक्रारी असून या तक्रारीचे निराकरण न झाल्यास मनसेच्या वतीने आंदोलन करण्यात येईल, असा इशारा मनसेचे अमोल लुलेकर, कपील महाजन आदींनी दिला.