रक्तदान करा, जगाचे स्पंदन कायम ठेवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2021 04:28 AM2021-06-17T04:28:18+5:302021-06-17T04:28:18+5:30
यावेळी अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.खेडकर, रक्तपेढी प्रमुख डॉ.सी.के. यादव, डॉ.के.ए. लोणकर, डॉ.अनिल कावरखे, डॉ.जाधव, डॉ.थोरात, डॉ.बालाजी हरण, डॉ.कोमल ...
यावेळी अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.खेडकर, रक्तपेढी प्रमुख डॉ.सी.के. यादव, डॉ.के.ए. लोणकर, डॉ.अनिल कावरखे, डॉ.जाधव, डॉ.थोरात, डॉ.बालाजी हरण, डॉ.कोमल टार्फे आदींची उपस्थिती होती. जिल्ह्यात सर्वत्र रक्तदानाचा टक्का वाढावा, यासाठी आरोग्य विभागाकडून सर्वंकष प्रयत्न केले जात आहेत, असे सांगून डॉ.राठोड म्हणाले की, कोरोनाच्या संकट काळात रक्ताची मोठ्या प्रमाणात उणीव भासली. ती दूर करण्यासाठी विविध ठिकाणी रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले. या माध्यमातून रक्ताची बऱ्यापैकी गरज भागली. यापुढेही नागरिकांनी रक्तदानासाठी स्वयंस्फूर्तीने पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. उपस्थित इतर मान्यवरांचीही यावेळी समयोचित भाषणे झाली.
..................
बाॅक्स :
तीन वर्षांत २३ हजार बॅग रक्त संकलन
वाशिम येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात शासकीय रक्तपेढीची १० जुलै, २००७ रोजी स्थापना झाली. सन २०१० ते आजपर्यंत एकूण २३ हजार २३० बॅग रक्त संकलन या माध्यमातून करण्यात आले. शासकीय रक्तपेढीतून थॅलेसेमिया, सिकलसेल, हिमोफेलिया, अप्लास्टिक ॲनिमिया व ॲनिमिया आदी आजारांमधील एकूण ११० रुग्णांना दर महिन्याला रक्तपुरवठा करावा लागतो, तसेच प्रसूतिकरिता येणाऱ्या स्त्रिया, अपघातग्रस्त व इतरही गरजू गरीब रुग्णांना रक्तपुरवठा रक्तपेढीमार्फत केला जात असल्याचे यावेळी सांगण्यात आले.