कोरोना प्रतिबंधक लस घेण्यापूर्वी रक्तदान करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2021 04:41 AM2021-05-14T04:41:08+5:302021-05-14T04:41:08+5:30
वाशिम : जिल्ह्यात मोठ्या संख्येने लसीकरण केले जात असून, लसीकरणानंतर काही दिवस रक्तदान करता येत नाही. त्यामुळे कोरोना प्रतिबंधक ...
वाशिम : जिल्ह्यात मोठ्या संख्येने लसीकरण केले जात असून, लसीकरणानंतर काही दिवस रक्तदान करता येत नाही. त्यामुळे कोरोना प्रतिबंधक लस घेण्यापूर्वी रक्तदान करा, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. मधुकर राठोड यांनी केले आहे.
दरवर्षी उन्हाळ्यात रक्ताचा तुडवडा भासतो, सध्या कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. त्यामुळे रक्तदान शिबिरांची संख्या कमी झाली आहे. थालासेमिया, सिकलसेल, हिमोफेलीया या आजाराने ग्रस्त रुग्णांना दर पंधरा दिवसाला रक्त घ्यावे लागते. तसेच गर्भवती स्त्रिया व इतर रुग्णांना रक्ताची गरज भासते. लसीचे दोन डोस घेतल्याच्या २८ दिवसांपर्यंत रक्तदान करता येत नाही. त्यामुळे १८ वर्षांवरील व्यक्तींनी कोरोना प्रतिबंधक लस घेण्यापूर्वी रक्तदान करावे, असे आवाहन डॉ. मधुकर राठोड यांनी केले आहे. रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे, प्रत्येक निरोगी व्यक्तीने रक्तदान करून इतरांचे जीव वाचविण्यासाठी मदत करावी. कोरोना प्रतिबंधक लस घेण्यापूर्वी रक्तदान करून वाशिम जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या जीवन अमृत शासकीय रक्तपेढीला सहकार्य करावे, असे आवाहन डॉ. राठोड यांनी केले आहे.