हरविलेल्या युवकाला दिले नातेवाईकांच्या ताब्यात !
By admin | Published: May 24, 2017 07:43 PM2017-05-24T19:43:57+5:302017-05-24T19:43:57+5:30
वाशिम - ओरिसा राज्यातून हरविलेला युवक वाशिम ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना आढळून आला. या युवकाना २४ मे रोजी त्याच्या नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम - ओरिसा राज्यातून हरविलेला युवक वाशिम ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना आढळून आला. या युवकाना २४ मे रोजी त्याच्या नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आले.
ठाणेदार सुनील अंबुलकर हे ग्रामीण स्टेशन वाशिम ग्रामीण हद्दीत परिसर पेट्रोलींग करीत असतांना त्यांना दगडउमरा फाट्याचे जवळ २५ वर्षाचा युवक उभा असलेला दिसून आला. हा युवक थोडा वेडसर असल्याचे लक्षात आल्याने त्याच्याजवळील मोबाईलवरून नातेवाईकांशी संपर्क साधला. त्यावेळी सदर युवकाचे नाव पवित्रकुमार पठानिया शेट्टी (३०) रा. सदाशिवपुर ता. सदर जिल्हा देंकानाल (ओरीसा) असल्याचे समजले. आई-वडिलाला एकुलता एक असलेला हा युवक गत तीन महिन्यांपासून बेपत्ता आहे. सदर युवक वाशिम येथे सापडल्याची माहिती मिळताच, नातेवाईकांनी या युवकाला घेण्यासाठी येतो, असा निरोप आंबुलकर यांच्याकडे दिला. २४ मे रोजी नातेवाईक क्रिश शिवप्रसाद मिश्रा व इतर काही जण वाशिम ग्रामीण पोलीस स्टेशन आल्यानंतर सदर युवकाला नातेवाईकांच्या ताब्यात दिले.