कमी टक्क्यात कर्जाचा मेसेज आला म्हणून ॲप डाऊनलाेड करू नका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2021 04:34 AM2021-07-25T04:34:13+5:302021-07-25T04:34:13+5:30

माेठया शहरांमध्ये अशा फसव्या मेसेजसमुळे अनेकांची फसवणूक झाल्याच्या घटना घडत आहेत. त्यामानाने वाशिम जिल्ह्यात यासंदर्भात गत तीन वर्षात एकही ...

Don't download the app because you get a low loan message | कमी टक्क्यात कर्जाचा मेसेज आला म्हणून ॲप डाऊनलाेड करू नका

कमी टक्क्यात कर्जाचा मेसेज आला म्हणून ॲप डाऊनलाेड करू नका

googlenewsNext

माेठया शहरांमध्ये अशा फसव्या मेसेजसमुळे अनेकांची फसवणूक झाल्याच्या घटना घडत आहेत. त्यामानाने वाशिम जिल्ह्यात यासंदर्भात गत तीन वर्षात एकही गुन्हा दाखल नसला तरी नागरिकांनी खबरदारी म्हणून सावधता बाळगणे गरजेची आहे. अशा मेसेजस, ॲप शक्यताेवर डाऊनलाेड न करणे, प्रतिसाद न देणे उत्तमच. काहीही शंका असल्यास नागरिकांनी स्थानिक पाेलीस, सायबर सेलकडे संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले.

------------

बँकखाते साफ करणाऱ्या ॲप डाऊलाेडिंगपासून सावध

कमी टक्क्यात कर्जाचा मेसेज आला की अनेकजण या माेहात पडून नवनवीन ॲप डाऊनलाेड करून स्वत:ची फसवणूक केल्याच्या घटना घडल्या आहेत. असे ॲप डाऊनलाेड करू नये.

एखाद्यावेळी ॲप डाऊनलाेड झाल्यास त्यावर येत असलेल्या सूचनांना न वाचता न समजता संमती देऊ नये. यामधून माेठी फसवणूक हाेऊ शकते.

शक्यताेवर माहिती नसलेले, अनाेळखी ॲप डाऊनलाेड करण्यापासून दूरच राहणे बरे. जमा केलेली पुंजी काही क्षणात रिकामी हाेऊ शकते. यासाठी नागरिकांनीच स्वत:हून खबरदारी घेणे आवश्यक आहे.

------

या अमिषापासून सावधान

अभिनंदन..अभिनंदन आपणास १ लाख रुपयांचे कर्ज मंजूर झाले... असे मेसेजसपासून सावध रहा.

सहज कमवा लाख रुपये महिना असेही काही मेसेज माेबाइलवर येतात. त्यापासून सावध रहा.

शून्य टक्के व्याजावर ताबडताेब लाेन उपलब्ध असे काही मेसेज आल्यास त्यांना प्रतिसाद देऊ नका. या मेसेजव्दारे अनेकांची फसवणूक झाली असल्याचे उदाहरण आहेत.

---------

गत तीन वर्षात जिल्ह्यात एकाचीही फसवणूक नाही

वाशिम जिल्हा सायबर सेलची सायबर गुन्ह्यांवर करडी नजर ठेवल्या जात असून वेळाेवेळी काॅलेज, शासकीय कार्यालयासह विविध ठिकाणी सायबर गुन्हयासंदर्भात जनजागृती केल्या जात आहे. यामुळे जिल्ह्यात गत तीन वर्षात सायबर सेल गुन्हे नगण्य आहेत. ॲप डाऊनलाेड केल्याने फसवणूक झाल्याचा एकही गुन्हा दाखल नाही.

-----

ही घ्या काळजी

एखाद्यावेळी एखादा ॲप डाऊनलाेड केल्यास मागितली जाणारी माहिती देऊ नका.

काेणतीही शंका असल्यास, फसवणूक हाेत असल्याचे लक्षात येताच ताबडताेब सायबर सेलशी संपर्क करा

तुरंत कर्ज देणारे अनेक मेसेज माेबाइलवर येतात. या मेसेजसना बळी न पडता त्याकडे दुर्लक्ष करा.

.......

सायबर क्राईमबाबत सायबर विभागामार्फंत करण्यात येत असलेली जनजागृतीमुळे जिल्ह्यात सायबर क्राईमचे प्रमाण कमी आहे. ॲप डाऊनलाेड केल्यानंतर फसवणुकीबाबत काेणतीच तक्रार नाही

अजयकुमार वाढवे, सायबर सेल प्रमुख, वाशिम

Web Title: Don't download the app because you get a low loan message

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.