संपर्कातील व्यक्तींच्या चाचणीकडे दुर्लक्ष नको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2021 04:29 AM2021-06-18T04:29:09+5:302021-06-18T04:29:09+5:30
.................. मुख्य रस्त्यांवर वाहनांची वर्दळ वाशिम : १ जूनपासून निर्बंध शिथिल करण्यात आले; तर १४ जूनपासून सर्वच दुकाने सुरू ...
..................
मुख्य रस्त्यांवर वाहनांची वर्दळ
वाशिम : १ जूनपासून निर्बंध शिथिल करण्यात आले; तर १४ जूनपासून सर्वच दुकाने सुरू ठेवण्यास मुभा देण्यात आली आहे. यामुळे बाजारपेठेत तोबा गर्दी होत असून मुख्य रस्त्यांवर वाहनांची वर्दळ असल्याचे दिसून येत आहे.
...................
थांबलेले प्रशिक्षण कार्य पुन्हा सुरू
वाशिम : कोरोना विषाणू संसर्गाच्या संकटातून आता बहुतांशी दिलासा मिळाला आहे. यामुळे मध्यंतरी थांबलेले बचतगटातील महिलांचे स्वयंरोजगाराचे प्रशिक्षण कार्य पुन्हा सुरू झाले आहे.
.......................
शेलू फाट्यावर वाहनांची तपासणी
वाशिम : शहरातून पुसदकडे जाणाऱ्या व शहरात येणाऱ्या सर्व वाहनांची शेलू फाट्यावर तपासणी केली जात आहे. शहर वाहतूक विभागाचे कर्मचारी तैनात असून विनामास्क प्रवास करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे.
.................
घरकुलांची कामे सुरू करण्याची मागणी
वाशिम : कोरोना विषाणू संसर्गाचे संकट मध्यंतरी तीव्र झाले होते. यादरम्यान रेतीचा तुटवडा निर्माण झाल्याने जिल्ह्यात अनेक ठिकाणी घरकुलांची कामे अर्धवट स्थितीत रखडली आहेत. ती आता सुरू करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.
..............
बँकांमध्ये गर्दी; नियमांचे उल्लंघन
वाशिम : शहरातील विविध बँकांमध्ये ग्राहकांची गर्दी होत असून फिजिकल डिस्टन्सिंगच्या नियमाचे उल्लंघन केले जात आहे. याकडे प्रशासनाने लक्ष पुरविण्याची मागणी होत आहे.