कोरोना लसीचे डोस संपले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2021 04:40 AM2021-04-17T04:40:46+5:302021-04-17T04:40:46+5:30
०००० नव्या महामार्गावर गतिरोधकांचा अभाव वाशिम : नव्याने तयार केलेल्या राष्ट्रीय महामार्गावर गतिरोधक नसल्यामुळे अपघातांची शक्यता निर्माण झाली आहे. ...
००००
नव्या महामार्गावर गतिरोधकांचा अभाव
वाशिम : नव्याने तयार केलेल्या राष्ट्रीय महामार्गावर गतिरोधक नसल्यामुळे अपघातांची शक्यता निर्माण झाली आहे. भरधाव वेगाने वाहने धावत आहेत. त्यामुळे गतिरोधक बसविणे आवश्यक आहे.
.............
आरटीओ जुनी इमारत विनावापर पडून
वाशिम : उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय नव्या इमारतीत स्थानांतरित झाले. तेव्हापासून जुनी इमारत विनावापर तशीच पडून असल्याने याचा गैरवापर होत आहे.
०००००००
मोबदला देण्याची धरणग्रस्तांची मागणी
वाशिम : रिसोड तालुक्यातील धरणांकरिता जमीन संपादित केलेले शेतकरी अद्याप मोबदल्यापासून वंचित आहेत. त्यांना तत्काळ मोबदला देण्याची मागणी धरणग्रस्तांनी केली आहे.
००००००
१३ प्रकल्पांच्या पातळीत घट
वाशिम : जिल्ह्यातील मध्यम, लघू प्रकल्पांसह बॅरेजेस मिळून सरासरी ३७ टक्के उपयुक्त साठा असला तरी, त्यातील १३ प्रकल्पांत २० टक्केही उपयुक्त साठा उरलेला नाही. त्यामुळे या प्रकल्पांवर अवलंबून असलेल्या गावांत येत्या एका महिन्यातच पाणीटंचाईची स्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
००००००
धनज परिसरात आरोग्य तपासणी
वाशिम : कोरोना संसर्ग पाहता आरोग्य विभागाकडून दक्षतेच्या दृष्टिकोनातून धनज परिसरात आरोग्य तपासणी व सर्वेक्षण मोहीम सुरू करण्यात आली आहे. या मोहिमेंतर्गत बाधित रुग्णाच्या संपर्कातील व्यक्तींसह इतरही व्यक्तींची तपासणी केली जात आहे.
०००
३९ वाहनांवर दंडात्मक कारवाई
वाशिम : शहर वाहतूक शाखेकडून राबविण्यात येत असलेल्या मोहिमेंतर्गत वाशिम शहरात शुक्रवारी वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ३९ वाहनचालकांकडून दंड वसूल करण्यात आला.
००००००
ग्रामसेवक, शिक्षकांची पदे रिक्त
वाशिम : किन्हीराजा जिल्हा परिषद गटातील ग्रामसेवक, शिक्षकांची जवळपास नऊ पदे रिक्त आहेत. रिक्त पदे भरण्यासंदर्भात जिल्हा प्रशासनाकडे वारंवार मागणी करण्यात आली. परंतु, अद्याप ही मागणी पूर्ण झाली नाही.
००००
पैनगंगा नदीच्या पुलावर खड्डेच खड्डे
वाशिम : तोंडगाव येथून काही किलोमीटर अंतरावर असलेल्या पैनगंगा नदीच्या पुलावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. यामुळे वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. खड्डे बुजविण्याची मागणी ग्रामस्थांतून केली जात आहे.