‘डबल मास्क’मुळे विक्रीत वाढ, सॅनिटायझरही खातेय भाव!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2021 04:41 AM2021-05-10T04:41:19+5:302021-05-10T04:41:19+5:30

दुसऱ्या लाटेत कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने सर्वत्र चिंतेचे वातावरण असल्याचे दिसून येते. कोरोना विषाणू संसर्गापासून बचाव म्हणून ...

‘Double Mask’ Increases Sales, Even Sanitizer Prices! | ‘डबल मास्क’मुळे विक्रीत वाढ, सॅनिटायझरही खातेय भाव!

‘डबल मास्क’मुळे विक्रीत वाढ, सॅनिटायझरही खातेय भाव!

Next

दुसऱ्या लाटेत कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने सर्वत्र चिंतेचे वातावरण असल्याचे दिसून येते. कोरोना विषाणू संसर्गापासून बचाव म्हणून मास्कचा वापर, सॅनिटायझरने हात वारंवार धुणे, फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन आणि रोगप्रतिकारकशक्ती वाढविणे आदी उपाय वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांकडून सांगितले जात आहेत. डबल मास्क वापरा आणि कोरोना टाळा, असाही सल्ला डॉक्टरांनी दिल्यामुळे गर्दीच्या तसेच सार्वजनिक ठिकाणी वावरताना डबल मास्क व सॅनिटायझरचा वापर वाढल्याने आपसूकच विक्रीतही वाढ होत असल्याचे दिसून येते. जिल्ह्यात कोेरोना चाचण्यांची संख्या वाढविण्यात आली असून, दैनंदिन सरासरी ४५० रुग्ण आढळून येत आहेत. कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून प्रत्येक जण मास्कचा वापर करण्याला प्राधान्य देत असल्याने मागणीत वाढ झाल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.

000

सॅनिटायझरची मागणी वाढली

कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत असल्याने आणि सौम्य व मध्यम लक्षणे असणारे रुग्ण हे अधिक संख्येने गृहविलगीकरणात राहत असल्याने सॅनिटायझरचा वापर वाढल्याचे दिसून येते. गृहविलगीकरणातील रुग्णामुळे घरातील इतर सदस्यांना कोरोना संसर्ग होऊ नये म्हणून सॅनिटायझरचा वारंवार मारा केला जात आहे. त्यामुळे साहजिकच पूर्वीच्या तुलनेत आता सॅनिटायझरची मागणी वाढली आहे.

००

कोट बॉक्स

अलीकडच्या काळात मास्क आणि सॅनिटायझरच्या मागणीत वाढ झाली आहे. अनेक जण डबल मास्कचा वापर करीत असल्याचे दिसून येते. याबरोबरच रोगप्रतिकारकशक्ती वाढविणाऱ्या औषधीलादेखील मागणी आहे.

- हुकूम पाटील तुर्के

संचालक, मेडिकल स्टोअर्स, वाशिम

Web Title: ‘Double Mask’ Increases Sales, Even Sanitizer Prices!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.