कर्जमाफीच्या अर्ज प्रक्रियेस ‘सर्व्हर डाउन’चा फटका!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2017 01:11 AM2017-08-10T01:11:45+5:302017-08-10T01:12:15+5:30

वाशिम: विद्यमान शासनाने अधिकांश योजना ‘ऑनलाइन’ करून  पारदश्री कारभाराचा निर्धार केला; मात्र योजनांतर्गत अर्ज भरताना  सर्वसामान्यांची मोठी तारांबळ उडत असून एकाचवेळी अतिरिक्त  ताण येत असल्याने ‘सर्व्हर डाऊन’ची समस्या वाढीस लागली आहे.  परिणामी, प्रशासकीय कामे सुसह्य होण्याऐवजी असह्य होत आहेत.  पीकविमा अर्ज प्रक्रियेतील अडथळ्यानंतर आता कर्जमाफी  प्रक्रियेलाही त्याचा मोठा फटका बसत असून, यामुळे शेतकरी त्रस्त  झाले आहेत. 

'Downward crash' for debt forgiveness application process! | कर्जमाफीच्या अर्ज प्रक्रियेस ‘सर्व्हर डाउन’चा फटका!

कर्जमाफीच्या अर्ज प्रक्रियेस ‘सर्व्हर डाउन’चा फटका!

Next
ठळक मुद्देशेतकरी त्रस्तमहा-ई सेवा केंद्र, ‘आपले सरकार’ सेवा केंद्रांवरील प्रकार

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम: विद्यमान शासनाने अधिकांश योजना ‘ऑनलाइन’ करून  पारदश्री कारभाराचा निर्धार केला; मात्र योजनांतर्गत अर्ज भरताना  सर्वसामान्यांची मोठी तारांबळ उडत असून एकाचवेळी अतिरिक्त  ताण येत असल्याने ‘सर्व्हर डाऊन’ची समस्या वाढीस लागली आहे.  परिणामी, प्रशासकीय कामे सुसह्य होण्याऐवजी असह्य होत आहेत.  पीकविमा अर्ज प्रक्रियेतील अडथळ्यानंतर आता कर्जमाफी  प्रक्रियेलाही त्याचा मोठा फटका बसत असून, यामुळे शेतकरी त्रस्त  झाले आहेत. 
महा-ई सेवा केंद्र, आपले सरकार सेवा केंद्रांमार्फत संपूर्ण राज्यात  ‘ऑनलाईन’ कार्यप्रणालीचा अवलंब करण्यात आला आहे. वास् तविक पाहता या बदललेल्या कार्यपद्धतीमुळे नागरिकांची कामे वेळेत  होणार असून त्यात कुठलाही गैरप्रकार होणार नाही, याची योग्य ती  सोय करण्यात आली आहे; परंतु योजनांतर्गत लाभ घेण्याकरिता  पुरेशी मुदत देऊनही लाभार्थींकडून अगदी शेवटच्या काही  दिवसांमध्येच अर्ज सादर करण्यासाठी धावपळ केली जात असल्याने  संगणकीय कार्यप्रणालीवर अतिरिक्त ताण येवून ‘नेट कनेक्टिव्हिटी’  गायब होणे, ‘सर्व्हर डाऊन’ होऊन संपूर्ण ‘ऑनलाइन’ यंत्रणा बंद  पडण्याचा प्रकार घडत असल्याने नागरिकांना त्रास सहन करावा  लागत आहे. 

पीक विम्याचे अर्ज भरल्या गेले ‘ऑफलाइन’!
पीकविमा अर्ज ‘ऑनलाइन’ सादर करण्यासाठी शासनाकडून पुरेशी  मुदत देण्यात आली होती; मात्र ३१ जुलैपर्यंत फारच कमी प्रमाणात  अर्ज सादर झाले. त्यामुळे ५ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली.  यादरम्यान ४ ऑगस्टला जिल्ह्यातील सर्वच महा-ई सेवा केंद्र आणि  आपले सरकार सेवा केंद्रांवर शेतकर्‍यांची तोबा गर्दी झाली; मात्र  अशातच ऑनलाइन कार्यप्रणालीचे ‘सर्व्हर डाऊन’ होऊन रात्री  उशिरापर्यंतही ते पुर्ववत झाले नाही. शेवटच्या दिवशी ५ ऑगस्टलाही  हाच प्रकार कायम राहिल्याने शेवटी पीकविम्याचे अर्ज ‘ऑफलाइन’  स्वीकारण्यात आले. 

एकाचवेळी अनेक कामे ‘ऑनलाइन’ करीत असताना संगणकीय  कार्यप्रणाली प्रभावित होणारच. त्यामुळे ‘सर्व्हर डाऊन’ची समस्या  उद्भवून सर्वांनाच त्रास सहन करावा लागतो. ही बाब लक्षात घेऊन  कर्जमाफीचे ‘ऑनलाइन’ अर्ज सादर करण्याच्या अंतिम मुदतीची प्र तीक्षा न करता जिल्ह्यातील शेतकर्‍यांनी आतापासूनच गर्दी न करता  टप्प्याटप्प्याने आपले अर्ज ‘ऑनलाइन’ सादर करून वेळेवर होणारी  गैरसोय टाळायला हवी. 
- भगवंत कुलकर्णी
जिल्हा व्यवस्थापक, आपले सरकार सेवा केंद्र

Web Title: 'Downward crash' for debt forgiveness application process!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.