प्रशासकीय कार्यालयांमध्ये पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष्य!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2017 08:11 PM2017-10-03T20:11:35+5:302017-10-03T20:11:51+5:30
वाशिम: स्थानिक जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालय, जिल्हा परिषदेसह इतरही प्रशासकीय कार्यालयांमध्ये पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवत आहे. जलपुनर्भरणाकडे झालेले दुर्लक्ष, पाणी शुद्धीकरण यंत्रांची देखभाल-दुरूस्तीअभावी झालेली दुरवस्था आदी कारणांमुळे ही स्थिती उद्भवली असून यामुळे कर्मचाºयांसह अधिकाºयांनाही विकतच्या पाण्यावर विसंबून राहावे लागत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क

दरवर्षीच्या तुलनेत यावर्षी जिल्ह्यातील पर्जन्यमान घटले असून वाशिम शहर तथा परिसरात तर परिस्थिती अधिकच गंभीर बनली आहे. वाशिम शहरातील नागरिकांसह प्रशासकीय कार्यालये, जवाहर नवोदय विद्यालय, शासकीय तंत्रनिकेतन विद्यालयाला पाणी पुरविणाºया एकबूर्जी जलाशयात आजमितीस उणापूरा १.७० दलघमी पाणीसाठा शिल्लक असल्याने नगर परिषदेने पाणीपुरवठ्याचा कालावधी वाढविला असून सद्या १२ दिवसआड पाणी मिळत आहे. त्याचा थेट परिणाम कार्यालयांवर झाला असून कर्मचारी त्रस्त झाले आहेत.