पेयजल नमूने तपासणीला "खो"!
By admin | Published: June 12, 2017 07:39 PM2017-06-12T19:39:26+5:302017-06-12T19:39:26+5:30
वाशिम : आरोग्य विभागामार्फत ग्रामीण भागातील पेयजल नमूने तपासणीची प्रक्रिया अद्याप सुरू झाली नसल्याची माहिती सूत्रांनी सोमवारी दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : दुषित पाणी पिण्यात आल्याने विविध स्वरूपातील आजार जडतात. पावसाळ्यात तर हा प्रश्न अधिकच गंभीर होऊन शासकीय तथा खासगी दवाखान्यांमध्ये रुग्णांची संख्या अचानक वाढायला लागते. असे असताना आरोग्य विभागामार्फत ग्रामीण भागातील पेयजल नमूने तपासणीची प्रक्रिया अद्याप सुरू झाली नसल्याची माहिती सूत्रांनी सोमवारी दिली.
विंधन विहिर, नळयोजनेव्दारे पुरविण्यात येणारे पाणी रासायनिक घटकयुक्त व विषारी असते. अशा पाण्यापासून नागरिकांचे संरक्षण करण्याकरिता आरोग्य विभागाच्या वतीने वाशिम जिल्ह्यातील विविध गावांमधील ४४५७ पेयजल स्त्रोताांमधील पाण्याचे नमुने घेऊन त्यांची तपासणी करण्याची मोहिम पंचायत विभागाच्या सहकार्याने आरोग्य विभागामार्फत राबविली जाते; परंतू जलसुरक्षकांमार्फत गावांमधील पाणी नमुने पाठविण्यात येत नसल्याने या मोहिमेला खीळ बसत असल्याचे दिसून येत आहे.