ठिबक, स्प्रिंकलरचे ३ कोटीचे अनुदान रखडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2020 04:27 PM2020-06-16T16:27:28+5:302020-06-16T16:27:50+5:30
खडलेले अनुदान तातडीने मिळावे, अशी मागणी पात्र लाभार्थी शेतकºयांनी केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
रिसोड (वाशिम) : सिंचनासाठी ड्रीप, ठिबक, स्प्रिंकलरच्या संचासाठी निवड झालेल्या शेतकºयांनी सावकारी कर्ज काढून साहित्य खरेदी केली. परंतू, सहा महिन्यानंतरही शेकडो शेतकºयांना अनुदान मिळाले नसल्याने कृषी विभागप्रती रोष व्यक्त होत आहे.
रिसोड तालुक्यातील शेकडो शेतकºयांची ड्रीप, ठिबक, स्प्रिंकलरच्या संचासाठी निवड झाली. दरम्यान सावकार कर्ज काढून शेतकºयांनी संच सुद्धा खरेदी केला. तातडीने अनुदान मिळेल या आशेवर सहा महिन्यांचा कालावधी उलटला आहे. कृषी विभागाकडून सर्वच फाईलची तपासणी सुध्दा झाली. परंतु अद्याप शेतकº्यांच्या खात्यात अनुदान प्राप्त न झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. उपविभागातील जवळपास अडीच हजार शेतकºयांना अनुदानाची प्रतिक्षा आहे. दररोज तालुक्यातील शेकडो लाभार्थी अनुदानासाठी तालुका कृषी अधिकारी कार्यालयात चकरा मारत दिसत आहेत. समाधानकारक उत्तर मिळत नसल्याने शेतकºयांमधून रोष व्यक्त होत आहे. आज ना उद्या अनुदान मिळेल ही अपेक्षाही आता धूसर झाली आहे. आधीच शेतकरी लॉकडाऊनमुळे त्रस्त झाले असताना स्प्रिंकलरचे अनुदान रखडल्याने यात आणखीच भर पडली आहे. रखडलेले अनुदान तातडीने मिळावे, अशी मागणी पात्र लाभार्थी शेतकºयांनी केली.