'समृद्धी’वर चालकाला डुलकी लागली; कार डिव्हायडरला धडकली, २ जण गंभीर जखमी
By सुनील काकडे | Updated: November 24, 2023 17:54 IST2023-11-24T17:53:48+5:302023-11-24T17:54:08+5:30
अपघातात चालक आणि मालक दोघेही जखमी झाल्याची घटना २४ नोव्हेंबर रोजी दुपारच्या सुमारास घडली.

'समृद्धी’वर चालकाला डुलकी लागली; कार डिव्हायडरला धडकली, २ जण गंभीर जखमी
वाशिम : समृद्धी महामार्गाने मुंबई येथून नागपूरकडे चाललेल्या कारच्या चालकास डुलकी लागल्याने कार डिव्हायडरला जावून धडकली. या अपघातात चालक आणि मालक दोघेही जखमी झाल्याची घटना २४ नोव्हेंबर रोजी दुपारच्या सुमारास घडली.
प्राप्त माहितीनुसार, सुरेश यादव आणि शाहनवाज शाहबाज (अंधेरी, मुंबई) हे दोघे एम.एच. २० ई ई २८७९ क्रमांकाच्या कारने मुंबईवरून नागपूरकडे चालले होते. ‘समृद्धी’च्या लोकेशन १८७ नजिक चालकास डुलकी लागल्याने नियंत्रण सुटून कार डिव्हायडरला जावून धडकली. त्यात दोघेही जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच समृद्धी महामार्ग रुग्णवाहिका १०८ चे पायलट विधाता चव्हाण व डॉ. बी.एस. राठोड यांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींवर तिथेच उपचार केले.
ट्रकचे स्टेअरिंग लॉक; ‘लोडिंग’चा ट्रक उलटला
लासलगाव येथून ट्रकमध्ये कांदे लोड करून अमरावतीच्या दिशेने चाललेला एम.एच.१३ बी.जी.क्यू. ५९६८ क्रमांकाचा ट्रकचे स्टेअरिंग मालेगाव ते वनोजादरम्यान अचानक लॉक झाल्याने उलटल्याची घटना २४ नोव्हेंबर रोजी सकाळी ८ वाजताच्या सुमारास घडली. ट्रकचे अतोनात नुकसान झाले असून चालक हाजी मलंग शेख (सोलापूर) हे अपघातात जखमी झाले.