चालकाचे नियंत्रण सुटले! ट्रक उलटला; समृद्धी महामार्गावरील घटना, जीवितहानी टळली
By संतोष वानखडे | Updated: November 20, 2023 18:00 IST2023-11-20T18:00:06+5:302023-11-20T18:00:28+5:30
ट्रक हिरवी मिरची घेऊन नागपूरहून मुंबइकडे जात होता.

चालकाचे नियंत्रण सुटले! ट्रक उलटला; समृद्धी महामार्गावरील घटना, जीवितहानी टळली
वाशिम : नागपूरवरून मुंबईकडे मिरची घेऊन जाणाऱ्या ट्रकचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ट्रक उलटल्याची घटना समृद्धी महामार्गावरील लोकेशन १६८ जवळ २० नोव्हेंबर रोजी घडली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र ट्रकचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
प्राप्त माहितीनुसार एमएच ४० सीएम ९३४८ क्रमांकाचा ट्रक हिरवी मिरची घेऊन नागपूरहून मुंबइकडे जात होता. समृद्धी महामार्गावरील लोकेशन १६८ जवळ चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक उलटला. अपघाताच्या घटनेची माहिती मिळताच एम.एस.एफ. फायर आणि रुग्णवाहिका मदतीसाठी घटनास्थळी पोहोचली. चालकाला विचारपूस केल्यानंतर चालक सुखरूप असल्याचे कळले.