वाहनधारकांना घरपोच ‘आरसी’ बुक, चालक परवाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2018 04:31 PM2018-10-30T16:31:43+5:302018-10-30T16:31:57+5:30

वाशिम : उपप्रादेशिक परिवहन विभागातर्फे वाहन नोंदणी पुस्तिका (आरसी बुक) तसेच वाहन चालक परवाना संबंधितांना घरपोच पोष्टाद्वारे पाठविण्यात येत असून, चालू वर्षात १ एप्रिल ते ३० सप्टेंबर या कालावधीत ८९१५ आरसी बुक तसेच ५४६६ चालक परवाना संबंधितांना पाठविण्यात आला.

Driver's home 'RC' book, driver's license | वाहनधारकांना घरपोच ‘आरसी’ बुक, चालक परवाना

वाहनधारकांना घरपोच ‘आरसी’ बुक, चालक परवाना

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क       
वाशिम : उपप्रादेशिक परिवहन विभागातर्फे वाहन नोंदणी पुस्तिका (आरसी बुक) तसेच वाहन चालक परवाना संबंधितांना घरपोच पोष्टाद्वारे पाठविण्यात येत असून, चालू वर्षात १ एप्रिल ते ३० सप्टेंबर या कालावधीत ८९१५ आरसी बुक तसेच ५४६६ चालक परवाना संबंधितांना पाठविण्यात आला.
परिवहन विभागाचे कामकाज गतिमान करण्याबरोबरच वाहनधारकांना घरपोच वाहन नोंदणी पुस्तिका तसेच चालक परवाना पोहचविण्यात येत आहे. वाहन खरेदी केल्यानंतर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात नोंदणी केली जाते. वाहन नोंदणीची प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर संबंधित वाहनधारकांनी कागदपत्रांमध्ये नोंदविलेल्या पत्त्यावर पोष्टाद्वारे वाहन नोंदणी पुस्तिका पाठविली जाते. ही पद्धत वाहन चालक परवान्यादेखील लागू करण्यात आली आहे. वाहन चालक परवानासंदर्भात स्मार्ट कार्ड दिले जात आहे. चालू वर्षात १ एप्रिल ते ३० सप्टेंबर या कालावधीत एकूण ८९१५ वाहनांची नोंदणी झाली असून, संबंधित वाहनधारकांना वाहन नोंदणी पुस्तिका तसेच ५४६६ जणांना वाहन चालक परवाना घरपोच पाठविण्यात आला आहे.

वाहन नोंदणी पुस्तिका तसेच वाहन चालक परवाना पोष्टाद्वारे घरपोच पाठविण्यात येत आहे. यामुळे संबंधितांना उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात कागदपत्रे नेण्यासाठी येण्याची गरज राहत नाही.
- जयश्री दुतोंडे
उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, वाशिम.

Web Title: Driver's home 'RC' book, driver's license

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.